Agriculture news in marathi; Decrease in number of tankers in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यात टॅंकरच्या संख्येत घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

जळगाव ः जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गिरणा, हतनूर, वाघूर आदी प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. गिरणा पट्ट्यासह अमळनेर, पारोळा भागांतील अनेक गावांमधील टंचाई कमी झाली आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली असून, फक्त १८ टॅंकर सध्या सुरू आहेत. 

जळगाव ः जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने गिरणा, हतनूर, वाघूर आदी प्रकल्पांमध्ये चांगला जलसाठा झाला आहे. गिरणा पट्ट्यासह अमळनेर, पारोळा भागांतील अनेक गावांमधील टंचाई कमी झाली आहे. परिणामी, टॅंकरची संख्या घटली असून, फक्त १८ टॅंकर सध्या सुरू आहेत. 

जुलैअखेर जिल्ह्यात ८२ गावांसाठी ७५ टॅंकर सुरू होते. मे व जूनमध्ये तीव्र उन्हाळ्यामुळे पाणीटंचाई वाढली. दोनशेवर टॅंकरची संख्या पोचली होती. त्यावर जिल्हा प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या. उन्हाळ्यात अनेक गावांना दहा ते पंचवीस दिवसांआड पाणीपुरवठा केला गेला. जूनमध्येही पावसाने तब्बल तेवीस दिवस ओढ दिली. यामुळे दुष्काळाची चिन्हे होती.

जिल्हा प्रशासनाने महसूल अधिकाऱ्यांना पर्यायी पाण्याचे स्रोत शोधण्याचे आदेशही काढले होते. जूनअखेर पाण्याच्या उपाययोजना बंद कराव्यात लागतात. मात्र, पाऊस नसल्याने शासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजना चांगला पाऊस होईपर्यंत सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. नंतर पावसाने हजेरी लावली. त्यात जुलैमध्ये काहीसा खंड पडला. आता श्रावणात बऱ्यापैकी पाऊस झाला असून, वार्षिक सरासरीच्या ६६ टक्के पाऊस पडला आहे.

जळगाव जिल्ह्यातही काही तालुक्‍यांत अतिवृष्टी झाली. मध्य प्रदेश व विदर्भातील पावसाने तापी नदीला दोन वेळेस मोठा पूर आला. यामुळे भुसावळ विभागातील बहुसंख्य गावांतील पाणीटंचाई मिटली आहे. परिणामी, टॅंकरची संख्या कमी झाली आहे, अशी माहिती मिळाली. टॅंकरची स्थिती ः भुसावळ तालुका ३, बोदवड १, चाळीसगाव ६, भडगाव २, अमळनेर ६. अमळनेर तालुक्‍यातील नऊ गावांमध्ये टॅंकर सुरू आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
पूरस्थितीतील द्राक्ष बागेचे व्यवस्थापनसां गली, कोल्हापूर व कर्नाटक शेजारील काही भागांत...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शरद पवार...मुंबई  ः कोल्हापूर, सांगली, सातारा या...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...