पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट

पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट
पाणीटंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट

नाशिक  : नाशिक विभागात जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (ता. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १९८, तर टॅँकर्सच्या संख्येत १७८ इतकी मोठी घट आली आहे. पावसामुळे टंचाईग्रस्त ३३५ गावांपैकी १९८ गावांसह ३८९ वाड्यांवरील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. विभागातील नंदुरबार आणि नगर जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांची संख्या शून्यावर आल्याने हे जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत.

अन्य जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्यात ७९, नाशिक जिल्ह्यात ४४ आणि धुळे जिल्ह्यातील १४ गावांतील टंचाईस्थिती कायम आहे. या गावांना टँकरद्वरे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे अद्यापही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ५३ वाड्यांवरील पाणीटंचाई कायम आहे. बागलाण, मालेगाव, सुरगाणा आणि नांदगाव तर नगर जिल्ह्यांतील संगमनेर, पारनेर, पाथर्डी आणि राहता या तालुक्यांतील गावांची टँकरच्या फेऱ्यातून सुटका झाली आहे.

टंचाईग्रस्त तालुके आणि गावे (कंसात) : सिन्नर (१२), येवला (३२), शिंदखेडा(९), साक्री(३), धुळे (२), अमळनेर (२९), जामनेर (१९), पारोळा (१६), चाळीसगाव (८), जळगाव (३), मुक्ताईनगर आणि भुसावळ (२) या तालुक्यांतील १३७ गावांत सध्या पाणीटंचाई कायम आहे. उर्वरित ४२ तालुके टंचाईमुक्त झाले आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नाशिक विभागातील टंचाईस्थिती

जिल्हा  जून २०१८   जुलै २०१८  
  गावे   टॅँकर्स   गावे टॅँकर्स   
नाशिक  १११  ८४  ४४ ३१
धुळे   १५  १२  १४   ११
नंदुरबार   २  १   ०  ०
जळगाव   १४४  ११४  ७९   ६२
नगर  ६३  ७१   ०   ०  
एकूण    ३३५    २८२    १३७   १०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com