खानदेशात कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस घट

खानदेशात कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस घट
खानदेशात कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस घट

जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक हळूहळू कमी होत आहे. यामुळे दर स्थिरावले आहेत. पांढऱ्या कांद्याला जळगाव बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटल ३५० ते ७५० रुपये प्रतिक्विंटलचा दर गुरुवारी (ता.२४) मिळाला. 

कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या साक्री व धुळे येथील बाजारातही आवक कमी होताना दिसत आहे. साक्री व धुळे बाजारात मागील तीन दिवसांत मिळून प्रतिदिन सात हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. सर्वाधिक आवक साक्री व पिंपळनेर येथील बाजारात होत आहे. तेथेही दर २०० ते ५०० रुपये आहेत. धुळ्यातही लाल कांद्याचे कमाल दर ६०० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती मिळाली. नंदुरबार जिल्ह्यात फारशी आवक नाही. परंतु, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) व चाळीसगाव येथील बाजारात आवक होत आहे. 

चाळीसगाव व जळगाव येथील बाजारात मोठी आवक होत असते. यात जळगाव येथील बाजारात मागील सात-आठ दिवसांपासून प्रतिदिन २६०० क्विंटलपर्यंत लाल कांद्याची आवक आहे. त्याला किमान २५० व कमाल ६५० रुपये प्रतिक्विंटलचे दर आहेत. मागील पंधरवड्यामध्ये सुरवातीला प्रतिदिन चार हजार क्विंटलपर्यंत कांद्याची आवक जळगाव बाजार समितीमध्ये होती. त्या वेळेस दर किमान १५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले होते. जशी आवक कमी होत आहे, तसे दरही स्थिरावल्याचे सूत्रांनी सांगितले.

आवक कमी होण्याची शक्यता

जळगाव बाजारात पांढऱ्या कांद्याची मागील तीन दिवस सरासरी ४०० क्विंटल आवक झाली. त्यास ३५० ते ७५० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. चाळीसगाव येथील बाजारातही मागील पंधरवड्यात कांद्याचे दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले होते. परंतु, नंतर आवक कमी होताच दर ६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत आहेत. अडावद व किनगाव येथेही कमाल ६५० रुपयांपर्यंत दर असल्याची माहिती मिळाली. पुढील १० ते १२ दिवसांत आवक आणखी कमी होईल, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com