गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घट

गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घट
गुलटेकडीत कांद्याच्या आवकेत घट

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १४) कांद्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती. यामध्ये जुन्या कांद्याची सुमारे ४०, तर नवीन कांद्याची सुमारे १० ट्रक आवक होती. या वेळी जुन्या कांद्याला प्रतिकिलोला ५५ ते ५८ रुपये, तर नवीन चांगल्या दर्जाच्या कांद्याला ३५ ते ४० रुपये दर होता. मात्र, नवीन कांद्यामध्ये ५ टक्के कांदाच उत्तम दर्जाचा होता. उर्वरित नवीन कांद्याला प्रतिकिलोला ५ ते २५ रुपये एवढा दर होता, अशी माहिती कांद्याचे प्रमुख अडतदार विलास रायकर यांनी दिली. 

गेल्या दोन-तीन दिवसांत आवकेच्या चढ-उतारामुळे कांद्याच्या दरामध्येदेखील झपाट्याने चढ-उतार होत आहेत, असेही रायकर यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून कांद्याची आवक निम्म्यावर आली असून, जुना कांदा संपत आला आहे. नव्या कांद्याचे उत्पादन आणि काढणी अद्याप सुरळीत झालेली नाही. 

सोमवारी (ता. ११) सुमारे ९० ट्रक आवक झाली होती. मात्र, नाशिक येथे कांदा व्यापाऱ्यांवर आयकर विभागाच्या पडलेल्या छाप्यांमुळे नाशिकमध्ये व्यापार मंदावल्याने शेतकऱ्यांनी पुणे बाजारात कांदा पाठविला. त्यामुळे पुण्यातील आवक वाढली. मात्र, पुण्यातील आवक वाढल्याने दर कमी झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा बाजारात पाठविणे बंद केल्याने बुधवारी (ता. १३) आणि गुरुवारी (ता. १४) आवक कमी झाल्याचेदेखील रायकर यांनी सांगितले. 

दरम्यान, पुणे बाजार समितीमधील या आठवड्याच्या शुक्रवारी (ता. १५) शेवटचा दिवस असल्याने आवक आणि मागणी वाढण्याची शक्यता आहे. आवकेवर उद्याचे दर ठरतील. आवक जर कमी झाली, तर चांगल्या दर्जाचे कांद्याचे दर २ ते ५ रुपयांनी वाढण्याची शक्यता रायकर यांनी व्यक्त केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com