Agriculture News in Marathi Decrease in production of urad, muga | Page 2 ||| Agrowon

उडीद, मुगाच्या उत्पादनात घट 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 25 नोव्हेंबर 2021

नांदेड जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यंदा मुगाचे हेक्टरी उत्पादन ४८२ किलो, तर उडदाचे हेक्टरी ४१२ किलो उत्पादन आल्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.

नांदेड : जिल्ह्यातील मूग, उडीद या खरिपातील पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत. यंदा मुगाचे हेक्टरी उत्पादन ४८२ किलो, तर उडदाचे हेक्टरी ४१२ किलो उत्पादन आल्यामुळे या पिकांच्या उत्पादनात घट झाल्याचेही समोर येत आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात यंदा जून व जुलैमध्ये अपुरा पाऊस त्यात पडलेला खंड याचा मोठा परिणाम या उडीद व मुगाच्या खरीप पिकांवर झाला आहे. त्यामुळे कमी कालावधीत येणाऱ्या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यात देगलूर, बिलोली, नायगाव, मुखेड, धर्माबाद या तालुक्यांत उडीद तसेच मुगाचे उत्पादन घेतले जाते.

परंतु पिकांच्या संवेदनशील काळातच पावसाने ओढ दिल्यामुळे या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, या पिकाच्या लागवड क्षेत्रात हेक्टरी किती उत्पादन झाले, याची मोजणी करण्यासाठी उडदाचे ४०२ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. यानुसार उडदाचे हेक्टरी ४१२ किलो आले आहे. तर मुगाचे २८६ पीक कापणी प्रयोग घेण्यात आले. यातून मुगाचे हेक्टरी ४८२ किलो उत्पादन आल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

हे पीक कापणी प्रयोगात ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक तसेच पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीसमोर निर्धारित प्लॉटवर पीक मोजणी करण्यात आली. जिल्ह्यातील मूग, उडीद पिकांचे कापणी प्रयोग नुकतेच पूर्ण झाले आहेत, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
 


इतर बातम्या
मेळघाटच्या स्ट्रॉबेरीची पर्यटकांना भुरळचिखलदरा, जि. अमरावती : महाबळेश्वरच्या धर्तीवर...
नागपूर जिल्ह्यात एक कोटी ६३ लाखांचा...नागपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने...
शेतजमिनीची कर्जे माफ करा;...कुरुंदवाड, जि. कोल्हापूर ः कर्मवीर दादासाहेब...
सांगली बाजार समितीला पुन्हा मिळाली...सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह सात...
अकोल्याचा सर्वसाधारण योजना नियतव्यय २००...अकोलाः जिल्ह्याच्या २०२२-२३ च्या सर्वसाधारण...
जवान अन् किसान देशाचे आधारस्तंभ:छगन...नाशिक: सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसेच...
नाशिक: श्रमदान, लोकसहभागातून तीन दुर्गम...नाशिक: जिल्ह्याच्या पश्चिम भागातील आदिवासी...
यावल/फैजपूर, जि.जळगाव : हवामानमापक...यावल/फैजपूर, जि.जळगाव : तालुक्यात डिसेंबरमध्ये...
मंगळवेढ्यात मका खरेदी केंद्र सुरु, ...सोलापूर ः मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ...
जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी...जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब...
Top 5 News: रशिया-युक्रेन संघर्षाचा...1. सध्या पंजाबपासून झारखंडपर्यंत हवेचा कमी दाबाचा...
मोहरीच्या वायदेवापसीची मागणी का होतेय?वायदेबंदीला विरोध वाढतो आहे. मोहरीचे वायदे पुन्हा...
देशाची मोहरी क्रांतीकडे वाटचालपुणेः खाद्यतेल आणि पेंडच्या दरातील तेजीमुळे...
उत्तर भारतात मोहरी,हरभऱ्याला अवकाळीचा...अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे उत्तर भारतातील...
रब्बी पेरणीत मक्याचे वर्चस्ववृत्तसेवा - चालू रब्बी हंगामात (Rabbi Season...
कृषी ड्रोन खरेदीसाठी केंद्र सरकारचे...  कृषी क्षेत्रातील ड्रोनच्या (drone )...
यंदाच्या हंगामात इथेनॉलचा पुरवठा...वृत्तसेवा - इंधनाच्या आयातीवरील (Fuel Import)...
मस्त्यव्यावसायिकांनी शास्त्रशुद्ध...मस्त्यव्यवसाय क्षेत्राने देशांतर्गत गरजा...
भारत ठरला काकडीचा सर्वात मोठा...पुणे - भारत जगात काकडीची (Cucumber) निर्यात (...
किमान तापमानात घट शक्य पुणे : अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त...