राळेगणसिद्धी, जि. नगर : प्रजासत्ताकदिनी (ता.
ताज्या घडामोडी
नांदेड जिल्ह्यात मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट
नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल, तर उडदाची ५.७९ क्विंटल आली. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक तालुक्यांत मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट आली आहे.
नांदेड : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल, तर उडदाची ५.७९ क्विंटल आली. महसूल, कृषी, ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पीककापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून हे स्पष्ट झाले आहे. परिपक्वतेच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्यामुळे अनेक तालुक्यांत मूग, उडदाच्या उत्पादकतेत घट आली आहे.
जिल्ह्यात यंदा २३ हजार २३९ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यंदा मुगाच्या २८८ पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी २८२ प्रयोग घेण्यात आले. त्यांचा विश्लेषणानंतर जिल्ह्याची मुगाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.५४ क्विंटल आली असल्याचे स्पष्ट झाले.
नायगाव तालुक्यातील उत्पादकता सर्वाधिक ९.९३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची सर्वांत कमी ३.२८ क्विंटल एवढी आली आहे. जिल्ह्यातील १६ पैकी नांदेड, लोहा, बिलोली, धर्माबाद, हियामतनगर, किनवट, हदगाव, भोकर या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, मुदखेड, कंधार, देगलूर, नायगाव, मुखेड, माहूर, उमरी या आठ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा अधिक आली आहे.
जिल्ह्यात यंदा २२ हजार ९८३ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. उडदाच्या ४२० पीककापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४०८ प्रयोग घेण्यात आले. एकूण ४०७ प्रयोगांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार उडदाची प्रतिहेक्टरी उत्पादकता सरासरी ५.७९ क्विंटल आल्याचे स्पष्ट झाले. देगलूर तालुक्याची उत्पादकता सर्वाधिक ११.७३ क्विंटल, तर लोहा तालुक्याची उत्पादकता सर्वांत कमी २.९५ क्विंटल एवढी आली.
नांदेड, मुदखेड, लोहा, धर्माबाद, माहूर, किनवट, हदगाव या सात तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा कमी; तर अर्धापूर, कंधार, बिलोली, देगलूर, नायगाव, मुखेड, हिमायतनगर, भोकर, उमरी या नऊ तालुक्यांची उत्पादकता पाच क्विंटलपेक्षा जास्त आली आहे.
तालुकानिहाय प्रतिहेक्टरी सरासरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)
तालुका | मूग | उडीद |
नांदेड | ४.८० | ४.६८ |
मुदखेड | ५.६७ | ४.७२ |
अर्धापूर | ६.९१ | ६.८२ |
हदगाव | ४.८३ | ४.८६ |
माहूर | ५.०३ | ४.८७ |
किनवट | ३.५६ | ३.०७ |
हिमायतनगर | ३.८५ | ६.२० |
भोकर | ४.०५ | ६.१२ |
उमरी | ६.०४ | ७.९४ |
धर्माबाद | ४.१३ | ७.९४ |
नायगाव. | ९.९३ | ७.४५ |
बिलोली | ४.७३ | ७.३३ |
देगलूर | ८.७५ | ११.७३ |
मुखेड | ७.२८ | ५.४९ |
कंधार | ५.८९ | ७.५८ |
लोहा | ३.२८ | २.९५ |