‘उजनी'च्या पाण्याने जमिनीच्या उत्पादकतेत घट !

Decrease in productivity of land with 'Ujani' water
Decrease in productivity of land with 'Ujani' water

सोलापूर  : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी झाली आहेच, हे पाणी पिण्यासाठीही धोकादायक आहे. विशेषतः या पाण्यामुळे जनावरांचे आजार वाढले आहेत, असा निष्कर्ष सोलापूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र, पर्यावरणशास्त्र आणि सामाजिक शास्त्र संकुलाने पाण्याचे नमुने घेऊन केलेल्या चाचणीतून काढण्यात आला आहे. पुण्यातील एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्‍त द्रव या पाण्यात मिसळत असून ते थांबविण्याची गरज आहे, असेही सूचवण्यात आले आहे. यासंबंधीचा अहवाल विद्यापीठाकडून शासनाच्या संबंधित विभागाला पाठवण्यात येणार आहे.

उजनी धरणामुळे सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांतील ५१ गावे अन्‌ ४७ हजार कुटुंबे या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. विद्यापीठाने सर्वेक्षणासाठी सोलापूर व पुणे जिल्ह्यातील प्रत्येकी दोन, तर नगर जिल्ह्यातील एका गावातील २८८ कुटुंबांचे सर्वेक्षण केले. उजनी धरणातील विविध ११ ठिकाणांहून पाण्याचे नमुने तपासणीला घेतले. मात्र, केमिकलयुक्‍त द्रव धरणातील पाण्यात मिसळल्याने पोटाचे विकार वाढल्याचे लक्षात आले. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. पी. धुळप, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. जी. माळी यांनी या संशोधनासाठी पुढाकार घेतला. 

केमिकलयुक्त पाण्यास रोखा

माणसांना त्याचा त्रास आहेच. पण जनावरे आजारी पडू लागली आहेत. महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करून शहराला पुरवठा केला जातो. तरीही पाण्यातील जडत्व जास्तच असल्याचा खुलासा महापालिका आयुक्‍त दीपक तावरे यांनी नुकताच केला आहे. दरम्यान, धरणातील पाणी शुद्ध राहावे, मासेमारीचा व्यवसाय उत्तम चालावा, यासाठी धरण परिसरातील एमआयडीसीतून येणारे केमिकलयुक्‍त पाणी थांबवणे काळाची गरज असल्याचे मत विद्यापीठाच्या या संशोधन करणाऱ्या पथकाने व्यक्‍त केले. 

औद्योगिक वसाहतीमुळे ‘उजनी’ दूषित

उजनी धरण पुणे परिसरातील औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या केमिकलयुक्‍त द्रवामुळेच दूषित, निरोगी आरोग्यासाठी जिल्ह्यातील धरण परिसरातील ग्रामपंचायतीने बसवावे जलशुद्धीकरण केंद्र, जलशुद्धीकरण केंद्रातून शुद्ध केलेल्या पाण्यातही जडत्व अधिक, पोटाच्या विकार वाढीची शक्‍यता, दूषित पाण्यामुळे धरण परिसरातील जनावरांचे आजार वाढले, पिकांच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम, अहवाल अंतिम झाल्यानंतर महापालिका, पाटबंधारे, उद्योग विभागाला पाठविला जाणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com