मराठवाड्यात रब्बी पीक क्षेत्रात घट

मराठवाड्यात रब्बी पीक क्षेत्रात घट
मराठवाड्यात रब्बी पीक क्षेत्रात घट

औरंगाबाद : रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १८ लाख ८६ हजार ५४० हेक्‍टर असलेल्या मराठवाड्यात यंदा केवळ १० लाख ५२ हजार ६९७ हेक्‍टरवरच रब्बी पेरणी शक्‍य झाली. जी पेरणी झाली, त्यामधील पिकांचीही अवस्था समाधानकारक नसल्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधोरेखित झाली आहे. 

मराठवाड्यात तृणधान्यांचे सर्वसाधारण क्षेत्र १२ लाख ६१ हजार २३४ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत ४४. ०५ टक्‍के म्हणजे ५ लाख ५५ हजार ५८२ हेक्‍टरवरच तृणधान्याची पेरणी झाली. त्यामध्ये रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९ लाख ४९ हजार ७७३ हेक्‍टर इतके आहे. त्यापैकी केवळ ३ लाख ९८ हजार २५४ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ ४१ टक्‍के क्षेत्रावरच ज्वारीची पेरणी शक्‍य झाली. त्याची स्थितीही जमिनीत ओल नसल्याने बिकट आहे. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ६६ हजार ८७ हेक्‍टर आहे. १ लाख २४ हजार ९४२ हेक्‍टरवरच गव्हाची पेरणी झाली. 

मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार २५३ हेक्‍टर, तर पेरणी २३ हजार ९० हेक्‍टर, कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १६ हजार ३८९, तर पेरणी ४ लाख ७५ हजार २१९ हेक्‍टर, हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख १४ हजार ६६ हेक्‍टर, तर पेरणी पीकनिहाय विचार करता सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सर्वाधिक ९२.०३ टक्‍के क्षेत्रावर म्हणजे ४ लाख ३७ हजार ९५७ हेक्‍टरवर झाली. गळीत धान्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८ हजार ९१७ हेक्‍टर आहे. त्याची परेणी २१ हजार ८९६ हेक्‍टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत केवळ २०.१० टक्‍के क्षेत्रावरच शक्‍य झाली. त्यामध्ये ११८ हेक्‍टरवरील रब्बी तीळ, १६ हजार २२७ हेक्‍टरवरील करडई, ९९९ हेक्‍टरवरील जवस, १६०२ हेक्‍टरवरील सूर्यफूल व २९५० हेक्‍टरवरील इतर गळीत धान्यांचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय रब्बी पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)  

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र   प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र 
औरंगाबाद  २०८१८७  ५०९४१
जालना १४१३९२ ९२२६५
बीड  ४२२७३० १२५०३२ 
लातूर  १९५१६४  १२७७४९ 
उस्मानाबाद ३३१४९६ २४५३८५
नांदेड  १३६५५६ १५३२३५
परभणी ३०१४३० १६८४९१
हिंगोली १४९५८५ ८९५९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com