खानदेशात कांदा आवकेत किरकोळ घट

खानदेशात कांदा आवकेत किरकोळ घट
खानदेशात कांदा आवकेत किरकोळ घट

जळगाव : खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे), धुळे, जळगाव, अडावद (ता. चोपडा), किनगाव (ता. यावल) व चाळीसगाव येथील बाजार, उपबाजारांमध्ये कांद्याच्या आवकेत किरकोळ घट झाली. पांढऱ्या कांद्याला प्रतिक्विंटल कमाल ८०० रुपयांपर्यंतचे दर मागील तीन -चार दिवसांत मिळाले. ते स्थिर आहेत.  

जळगाव बाजार समितीत पांढऱ्या कांद्याची आवक अधिक असून, ती प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल एवढी आहे. या कांद्याला किमान ३५० व कमाल ८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. लाल कांद्याची मागील आठ-१० दिवसांपूर्वी एकट्या जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ४००० क्विंटलपर्यंतची आवक झाली होती. परंतु, आवकेत मागील पाच-सहा दिवसांत किरकोळ घट होऊन ती साडेतीन ३६०० ते ३८०० क्विंटल अशी आहे. लाल कांद्याचे दर किमान ३०० व कमाल ६५० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कांदा दरात मागील आठवड्यातच सुधारणा झाली होती. यानंतर क्विंटलमागे पुन्हा ३० ते ५० रुपयांची सुधारणा मागील चार-पाच दिवसांत झाली.

मध्यंतरी धुळे बाजारात दोन दिवस कांद्याचे लिलाव होत नव्हते. कारण कांद्याची मोठी आवक सुरू होती. लागलीच लिलाव करून शेतकऱ्यांना पैसे देण्यासंबंधी खरेदीदारांनी अडचणी दाखविल्या होत्या. अशीच स्थिती जळगाव बाजारातही होती. परंतु, आवकेत किरकोळ घट झाल्याने लिलाव एक किंवा दोन दिवसांत पूर्ण होत आहेत. दर्जेदार कांद्याला प्रतिक्विंटल ७०० रुपयांपर्यंतचे दर जळगाव येथील बाजारात मिळाल्याची माहिती मिळाली. चाळीसगाव, जळगाव व अडावद येथील बाजारांमध्ये मिळून रोज सहा हजार क्विंटलपर्यंत कांद्याची आवक होत आहे. धुळे व पिंपळनेर येथेही रोज चार हजार क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com