देशात तिळाच्या पेरणी क्षेत्रात घट

देशात तिळाच्या पेरणी क्षेत्रात घट
देशात तिळाच्या पेरणी क्षेत्रात घट

मुंबई ः खरिपात तीळ पिकाचे क्षेत्र वार्षिक ६.१ टक्क्यांनी कमी होऊन १.२७ दशलक्ष हेक्टर झाले आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत असे नमूद केले आहे. तर मध्य प्रदेशात पेरणी कमी होती.

मागील आठवड्यात पेरणीचे अंतर ५.४ टक्क्यांनी वाढली आहे. दुसरा मोठा उत्पादक असलेला मध्य प्रदेश पेरणीत २९.५ टक्क्यांनी मागे पडला असून तेथे ३,११,००० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर आणखी एक प्रमुख उत्पादक असलेल्या राजस्थानमध्ये तिळाखालील क्षेत्र ०.९ टक्क्यांनी वाढून २,८८,७०० हेक्टर झाले होते.

सर्वाधिक उत्पन्न घेणाऱ्या उत्तर प्रदेशात पेरणी क्षेत्रात वार्षिक २५.८ टक्क्यांनी वाढ होऊन ४,१७,४३५ हेक्टर क्षेत्र होते. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रात होणारी एकूण घसरण रोखली आहे.

राज्यनिहाय तीळाचे आतापर्यंत लागवडीखालील क्षेत्र
राज्य २०१९-२० (हेक्टरमध्ये) २०१८-१९ (हेक्टरमध्ये) बदल (टक्केवारीत) सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टरमध्ये)
छत्तीसगड २८,३३० ३०,००० (-)५.६ १९,७८४
गुजरात ८९,४५२ ७५,२३९ १८.९ १७०,८००
कर्नाटक १५,३११ ३०,४०० (-)४९.६ ४१,४००
मध्य प्रदेश  ३,११,००० ४४१,००० (-)२९.५ ३५८,९८०
महाराष्ट्र  ११,०१० १२,९२३ (-)१४.८ २९,४२२
ओडिशा  ५७,८४६ ८३,४५८ (-)३०.७ १४,८३७
राजस्थान  २८८,७०० २८६,००० ०.९ ३१५,२२०
उत्तर प्रदेश  ४,१७,४३५ ३३१,४३८ २५.९ ३६२,०४०
एकूण  १२,७१,९४२.९ १३,५४,२६० (-)६.१ १४,१२,६९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com