Agriculture News in Marathi Decrease in state minimum temperature | Page 2 ||| Agrowon

राज्याच्या किमान तापमानात घट 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 नोव्हेंबर 2021

राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश निरभ्र झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. आज (ता. २७) राज्याच्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश निरभ्र झाले आहे. शुक्रवारी (ता.२६) राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात काहीशी घट झाल्याचे दिसून आले. आज (ता. २७) राज्याच्या मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. उन्हाचा चटक्या बरोबरच उकाड्यातही वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. यातच उत्तरेकडील थंड हवा येऊ लागल्याने किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरूवात झाली आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या खाली आले आहे. वाशीम येथे नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 

शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३२.७ (१६.८), नगर ३१.९(१८.७), जळगाव ३३.० (१९.४), कोल्हापूर ३१.३ (२०.५), महाबळेश्वर २५.६(१६.४), नाशिक ३२.३ (१७.६), निफाड ३०.१ (१६.२), सांगली ३१.३ (२०.७), सातारा ३०.१(१९.९), सोलापूर ३३.६ (१७.६), सांताक्रूझ ३५.२ (२३.६), अलिबाग ३२.९ (२२.८), डहाणू ३२.२ (२२.८), रत्नागिरी ३६.० (२४.५), औरंगाबाद ३२.६ (१६.९), नांदेड ३२.२ (१९.२), परभणी ३२.४ (१८.५), अकोला ३३.१ (१९.२), अमरावती ३२.४ (१७.५), ब्रह्मपुरी ३३.४ (१९.२), बुलडाणा ३१.५ (१७.६), चंद्रपूर ३१.२ (१९.८), गडचिरोली -(१८.४), गोंदिया ३०.२ (१७.८), नागपूर ३१.४ (१८.३), वर्धा ३२.०(१८.२), वाशीम ३४.० (१६.०), यवतमाळ - (१८.०). 

बंगालच्या उपसागरात तयार होतेय कमी दाब क्षेत्र 
बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. यामुळे तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.   


इतर बातम्या
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
सरकारने कापसाला दहा हजार रुपये हमीभाव...नागपूर : भारतीय बाजारपेठेत कापसाचे दर १० हजार...
केसर आंबा निर्यातीस मोठी संधी ः डॉ....औरंगाबाद : ‘‘या वर्षी देशांतून आंबा निर्यात खुली...
वाशीम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था निर्माण...वाशीम ः जिल्ह्यात ग्रामीण भागाच्या विकासासाठी,...
‘जालना पाटबंधारे’कडून भूसंपादनाची...औरंगाबाद : भूसंपादनाची कार्यवाही जालना पाटबंधारे...
कृषी योजनांत नगर राज्यात आघाडीवरनगर ः ‘‘कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ...
आंबेगावच्या ४०० श्रमिकांची ‘ई-श्रम...पुणे : केंद्र सरकारच्या, श्रम व रोजगार...
कनेरगावात ६५ एकरांवर मॉडर्न मार्केट...हिंगोली ः ‘‘जिल्ह्यातील वसमत येथील राष्ट्रीय...
वीजबिल थकबाकीवरून महाविकास आघाडीत कुरबूरमुंबई :  राज्यातील विविध पाणीपुरवठा संस्था...
औरंगाबाद जिल्ह्याची विकासकामांत घोडदौड...औरंगाबाद : ‘‘औरंगाबाद जिल्ह्याची विविध...
पुणे जिल्ह्यातील पशुधनाला मिळणार...पुणे ः ‘‘जिल्ह्याच्या ग्रामिण आणि दुर्गम भागातील...
सातारा जिल्हा बँकेचे कामकाज नेत्रदीपक...सातारा : ‘‘शेतीपूरक व्यवसायात व कर्जपुरवठ्यात...
परभणी जिल्ह्यात ‘रोहयो’ची १ हजार ७२०...परभणी ः जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
कृषी पंपाची वीज तोडणी न थांबविल्यास...यवतमाळ : ‘‘रब्बी पिकांना पाण्याची गरज असताना वीज...
धान खरेदीला मुदतवाढ द्या, अन्यथा आंदोलनगडचिरोली : शासकीय आधारभूत केंद्रांवर धान विक्रीची...
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत...नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने...
खानदेशात पीक कर्ज वितरण अत्यल्प ...जळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पीक कर्ज वितरण...
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या...जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी...