नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार हेक्टरवर घट
नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार हेक्टरवर घट

नांदेड विभागात ऊस क्षेत्रात ६० हजार हेक्टरवर घट

नांदेड : दुष्काळी स्थितीमुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गतच्या चार जिल्ह्यांतील ऊस क्षेत्रात ६० हजार ८६१ हेक्टरने घट झाली आहे. अंतिम करण्यात आलेल्या क्षेत्रानुसार २०१९-२० वर्षीच्या हंगामात ८१ हजार ६४२ हेक्टरवरील ४२ लाख ९४ हजार ५०० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

पाण्याअभावी परभणी, हिंगोली, लातूर या जिल्ह्यांतील उसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. नांदेड जिल्ह्यात कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे; परंतु इसापूर येथील ऊर्ध्व पैनगंगा कालव्याच्या पाणी आवर्तनामुळे लाभक्षेत्रात ऊस लागवड क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ६ हजार ६९७ हेक्टरने वाढ झाली. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडील आकडेवारीनुसार या जिल्ह्यांमध्ये उसाचे अंदाजे क्षेत्र ५७ हजार २३१ हेक्टर आहे. कारखान्याकडील माहितीनुसार उसाचे अंदाजे क्षेत्र १ लाख ३१ हजार ९११.५१ हेक्टर आहे.

परभणी जिल्ह्यात १५ हजार ७५९ हेक्टरवरील प्रतिहेक्टरी ५० टन उत्पादकतेनुसार ७ लाख ८७ हजार ९५० टन ऊस, हिंगोलीत ६ हजार १२१ हेक्टरवरील प्रतिहेक्टरी ६० टन उत्पादकतेनुसार ३ लाख ६७ हजार २६० टन, नांदेड जिल्ह्यात ३० हजार हेक्टरवरील प्रतिहेक्टरी ६० टन उत्पादकतेनुसार १८ लाख टन आणि लातूर जिल्ह्यात २९ हजार ७६२ हेक्टरवरील प्रतिहेक्टरी ४५ टन उत्पादकतेनुसार १३ लाख ३९ हजार २९० टन ऊस येत्या हंगामात गाळपासाठी उपलब्ध होऊ शकेल. 

तीन जिल्ह्यांत ६० हजार हेक्टरवर क्षेत्रात घट

दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी लागवड टाळली. शेतातील ऊस पाण्याअभावी होरपळून गेला. त्यामुळे परभणी जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात २९९४१ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यात ५ हजार ७९ हेक्टर आणि लातूर जिल्ह्यात ३२ हजार ५३८ हेक्टर घट झाली. या तीन जिल्ह्यांत एकूण ६० हजार हेक्टरवर ऊस क्षेत्र घटले.

जिल्हानिहाय ऊस लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा २०१८-१९ २०१९-२०
परभणी ४५७०० १५७५९
हिंगोली ११२००  ६१२१
नांदेड २३३०३   ३००००
लातूर  ६२३००  २९७६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com