Agriculture news in marathi Decrease in useful water in Marathwada | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 मार्च 2020

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८४ लघू आणि ७ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८४ लघू आणि ७ मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेबरोबर पाणीसाठेही झपाट्याने तळाच्या दिशेने जात आहे. ८७३ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा संकल्पीत पाणीसाठ्याच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी झाला आहे. 

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ६० टक्‍के, ७५ मध्यम प्रकल्पांत ३३ टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. सर्वाधिक संख्येने असलेल्या ७४९ लघू प्रकल्पांत केवळ २४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. या लघू प्रकल्पांपैकी ८४ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २५, जालना ११, बीड २६, लातूर १२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दहा प्रकल्पांचा समावेश आहे. १६२ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४, जालना १३, बीड २९, लातूर ४२, उस्मानाबाद ६३, नांदेड ४, परभणी ६ तर, हिंगोली जिल्ह्यातील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे. तब्बल १५९ लघू प्रकल्पांत २५ टक्‍क्‍यांपेक्षाही कमी उपयुक्‍त पाणी आहे. 

७५ मध्यम प्रकल्पांपैकी ७ प्रकल्प कोरडेठाक आहेत. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील २, बीडमधील ४ तर, लातूरमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे. तब्बल १३ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. 

लघू प्रकल्पांतील पाणीसाठा चिंताजनक 

मराठवाड्यातील ७४९ लघू प्रकल्पांपैकी तब्बल ४१० प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नाही. जालना जिल्ह्यातील  ५७ व उस्मानाबाद जिल्ह्यातील २०५ लघू प्रकल्पांत केवळ १५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील १२६ व परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात केवळ २५ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.


इतर अॅग्रो विशेष
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...