Agriculture news in marathi Decrease vegetable exports to Mumbai from South Maharashtra | Agrowon

दक्षिण महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणाऱ्या भाजीपाल्यात घट 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 21 एप्रिल 2020

कोल्हापूर : मुंबईची बाजारपेठ सुरू होऊन चार दिवसांहून अधिक काळ झाला असला तरी दक्षिण महाराष्ट्रातून अत्यल्प शेतमाल या बाजारपेठेत जात आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी अनास्था दाखविल्याने विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातून अगदी नाममात्र शेतमाल मुंबईला जात असल्याने नुकसानीचे दुष्टचक्र कायम असल्याचे चित्र आहे. 

कोल्हापूर : मुंबईची बाजारपेठ सुरू होऊन चार दिवसांहून अधिक काळ झाला असला तरी दक्षिण महाराष्ट्रातून अत्यल्प शेतमाल या बाजारपेठेत जात आहे. बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी अनास्था दाखविल्याने विशेष करून कोल्हापूर जिल्ह्यातून अगदी नाममात्र शेतमाल मुंबईला जात असल्याने नुकसानीचे दुष्टचक्र कायम असल्याचे चित्र आहे. 

गेल्या सप्ताहात मुंबई बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल वाहतूक थांबली होती. काही कालावधीनंतर बाजारपेठ सुरू झाली असली तरी ती अद्यापही सुरळीत झाली नाही. मुंबईत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदीला अनुत्सूकता दाखविली आहे. यामुळे शेतमाल पाठवायचा कोणाकडे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत उठाव नसल्याने भाजीपाला उत्पादकांची कोंडी कायम आहे. परिणामी भाजीपाल्याची काढणीही गतीने होत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. 

भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकरी सागर संभूशेटे यांनी सांगितले की, आमच्या गावातील भाजीपाला संघानी गेल्या चार दिवसांत एकही ट्रक भाजीपाला मुंबईला पाठविला नाही. व्यापाऱ्यांची खरेदीबाबत अनास्था, आणि व्यापाऱ्यांची अनुपलब्धता असल्याने आम्ही शेतमाल बाजारपेठेत पाठविला नाही. भाजीपाल्याची खरेदी झाली नाही तर होणारे नुकसान मोठे असल्याने आमच्या भागातून गाड्या मुंबई बाजारपेठेत गेल्या नाहीत. स्थानिक पातळीवर तातडीने पर्यायी व्यवस्था करण्याची गरज आहे.


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...