agriculture news in marathi, Decrease in vegetable incoming in Kolhapur | Agrowon

कोल्हापुरात भाजीपाल्याच्या आवकेत घट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

कोल्हापूर : गेले दहा बारा दिवस धुवाधार पाऊस सुरू असल्याने विविध नद्यांना पूर आला. ओढे नाले भरून वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून शाहू मार्केट यार्डातील भाजीपाला, कांदा बटाटा खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे. कोकणाकडे जाणारा भाजीपाल्याचा माल निम्म्याने घटला आहे. शिरोळ, सांगली भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात सोमवारी (ता. ५) सौदे व्यवहार निम्म्याने घटले.

कोल्हापूर : गेले दहा बारा दिवस धुवाधार पाऊस सुरू असल्याने विविध नद्यांना पूर आला. ओढे नाले भरून वाहत आहेत. याचा परिणाम म्हणून शाहू मार्केट यार्डातील भाजीपाला, कांदा बटाटा खरेदी विक्रीवर परिणाम झाला आहे. कोकणाकडे जाणारा भाजीपाल्याचा माल निम्म्याने घटला आहे. शिरोळ, सांगली भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात सोमवारी (ता. ५) सौदे व्यवहार निम्म्याने घटले.

बाजार समितीत दररोज पहाटे भाजीपाला सौदे निघतात. त्यासाठी जवळपास दीडशे ते दोनशे गाड्या भाजीपाल्याची आवक होते. यात शिरोळ तालुक्यातून येणारी वांगी, भेंडी, गवार, कालीफ्लॉवर, कोबी, अशा भाज्यांची आवक गेली तीन दिवस थंडावली आहे. या भागातून रोज किमान २५ गाड्या माल येतो. तो आलेला नाही. थोड्याफार फरकाने अशीच स्थिती चिकोडी, गोकाक या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आहे.  तेथून ही जवळपास १५ ते २० गाड्या येऊ शकलेल्या नाहीत. अशात इस्लामपूर, जुनोनी कवठेमंकाळ, कागल या भागांतून पर्यायी मार्गाने काही भाजीपाल्याच्या गाड्या आल्या. तेवढ्याच शंभरावर गाड्यातील भाजीपाल्याची सौदे झाले. 

या सौद्यात बहुतांशी भाजीपाला स्थानिक किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी केला. तोच माल कोल्हापुरातील विविध भाजी मंडईत विकला जात आहे. रत्नागिरीकडे जाणारा मार्ग केरली दरम्यान बंद असल्यामुळे रत्नागिरीकडे भाजीपाला जाऊ शकला नाही. थोड्याफार फरकाने सिंधुदुर्ग, मालवण, सावंतवाडी या भागाकडे पाठवल्या जाणाऱ्या मालाची मागणी कमी आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने सौदेही झाले नाहीत. माल पाठवला गेला नाही. दोन ते तीन गाड्यांचा माल आंबोली मार्गे गोव्याकडे रवाना झाल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सुप्रसिद्ध पैलवान दादू चौगुले यांचे निधनकोल्हापूर : हिंदकेसरी, रुस्तुम ए हिंद, महाराष्ट्र...
उजनी धरणातून भीमा नदीत पुन्हा ३० हजार...सोलापूर  ः पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा...
राजापूर, रत्नागिरी, संगमेश्‍वर...रत्नागिरी  ः राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर...
कापूस उत्पादकता वाढीसाठी शासनाने...अकोला : महाराष्ट्रात कापूस लागवड क्षेत्र...
पुणे जिल्हयात हलक्या ते मध्यम पावसाची...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
मंगळ, चंद्रसदृश मातीमध्ये पिकांचे...नासा या अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने चंद्र आणि...
पुणे जिल्ह्यात तीन लाख हेक्टरवर रब्बी...पुणे : मॉन्सूनच्या अंतिम टप्प्यातील पावसाने...
नगर जिल्हा परिषदेमध्ये दूरध्वनीवरील...नगर  : पाणी येत नाही. शिक्षक शाळेत उशिरा...
विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारतोफा...मुंबई : चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी...
घाटशीळ पारगाव प्रकल्प कोरडानगर : जिल्ह्यात यंदा पावसाळा संपत आला तरी अजून...
उमेदवारी देऊन केलेली चूक सुधारा : पवारसातारा : ‘‘वरुणराजानेही आपल्याला आशीर्वाद दिले...
काकडा परिसरात सोयाबीन काढणीच्या...काकडा, अमरावती ः परिसरात सोयाबीन...
अकोला येथे पावसाळी वातावरणाने...अकोला ः गेल्या २४ तासांपासून या भागात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात वावडिंग खरेदी सुरू सिंधुदुर्ग  ः बहुउपयोगी वावडिंग खरेदीला...
पट्टणकोडोलीला ‘इट्टल-बिरोबाच्या नावानं...पट्टणकोडोली, जि. कोल्हापूर  : ‘इट्टल-...
विश्रांतीनंतर सोलापुरात पुन्हा सर्वदूर...सोलापूर  ः गेल्या काही दिवसांच्या...
शेतकरी, जनतेच्या प्रश्नांची उत्तरे...नगर  : राज्यात पाच वर्षांत १६ हजार शेतकरी...
महायुतीला ऐतिहासिक विजय मिळेल ः...मुंबई ः केंद्र आणि महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना...
आपण विजयाचा जल्लोष साजरा करू ः...नागपूर : मतदानाचा दिवस युद्धदिन समजून...
भाजप-शिवसेनेने पाच वर्षे  फक्त थापा...मुंबई : पाच वर्षे ज्यांनी विविध आश्वासने...