agriculture news in Marathi, Decrease in vegetable production; Inverted slowdown | Agrowon

भाजीपाल्याच्या उत्पादनात घट; गुलटेकडीत आवक मंदावली
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 एप्रिल 2019

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत स्थिर होती. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान कांदा, आले, घेवडा, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. २८) भाजीपाल्याची सुमारे १५० ट्रक आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवकेत स्थिर होती. मात्र, सध्याची दुष्काळी परिस्थिती आणि वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झाल्याने आवक सरासरीपेक्षा मंदावली आहे. दरम्यान कांदा, आले, घेवडा, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली होती. तर पालेभाज्यांचे वाढलेले दर स्थिर होते.

विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, हिमाचलप्रदेशातून सुमारे ५ ट्रक मटार, आंध्रप्रदेश आणि गुजरात येथून ३ ट्रक कोबी, कर्नाटकमधून तोतापुरी कैरी सुमारे ६ टेम्पो, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, टॉमेटो सुमारे ४ हजार क्रेट, कोबी आणि फ्लॉवर प्रत्येकी सुमारे १० टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, तांबडा भोपळा १० टेम्पो, भेंडी १० तर गवार सुमारे ८ टेम्पो, काकडी १०, गावरान कैरी सुमारे ४ टेम्पो, चिंच ४० गोणी तर उन्हाळी भुईमूग सुमारे ६० गोणी, तसेच कांदा सुमारे ७० ट्रक तर स्थानिकसह आग्रा, इंदौर येथून बटाट्याची सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा - ७०-११०, बटाटा- १००-१५०, लसूण - ५००-७००, आले : सातारी ६००-७००, भेंडी : १५०-२५०, गवार : २००-३००, टोमॅटो - १००-१५०, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : ४००-६००, दुधी भोपळा : ८०-१४०, चवळी : १५०-२००, काकडी : ८०-१२०, कारली : हिरवी ४००-४५०, पांढरी २५०-३००, पापडी : २५० -३००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १००-१२०, वांगी : १०० -१५०, डिंगरी : १५० -२००, नवलकोल :१०० -१२०, ढोबळी मिरची : ३५०-४००, तोंडली : कळी ३००- ३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : २००-२५०, गाजर : १४०- १६०, वालवर : ३००-३५०, बीट : ७०-८०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १५० -२००, आर्वी : ३००- ३५०, घोसावळे : १५० -२००, ढेमसे : १००-२००, भुईमूग : ४०० -४५०, पावटा : ५०० -६००, मटार : ५२०-५५०, तांबडा भोपळा १५०-२००, चिंच अखंड ३०० -३५०, सुरण : २००-२२०, मका कणीस : ५०-८०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे सव्वा लाख तर मेथीची सुमारे अवघी सुमारे  ३५ हजार जुड्या आवक झाली होती.
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : १००० -१३००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१०००, कांदापात : १८०० -२०००, चाकवत : ६०० -८००, करडई : ५०० -८००, पुदिना : ३०० -४००, अंबाडी : ८००-१०००, मुळे : १४००-१५००, राजगिरा : ६०० -८००, चुका : १०००-१२००, चवळई : ७०० -८००, पालक : ८०० -१०००.

फळबाजार
रविवारी (ता. २८) मोसंबी सुमारे ५५ टन, संत्री १५ टन, डाळिंब २०० टन, पपई १० टेम्पो, लिंबे सुमारे दोन हजार गोणी, चिक्कू दीड हजार डाग, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २० टेम्पो, आणि द्राक्षांची ३ टन आवक झाली होती. तर कोकणातून हापूस आंब्याची सुमारे ८ हजार पेटी आवक झाली होती. तर कर्नाटकातून विविध जातींच्या आंब्याची सुमारे १५ हजार पेटी, करंडीची आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४००-११००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ६०-१५०, संत्रा : (३ डझन) : २००-७००, (डझन ४) : ६०-२५०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : १०-६०, गणेश ५-२०, आरक्ता ५-३०. कलिंगड : ५-१३, खरबूज : १०-२०, पपई : ५-२०, चिक्कू : १००-७००, द्राक्षे : सुपर सोनाका (१५ किलो) १०००-१३००, माणिकचमन (१५ किलो) ७००-९००. आंबा (कर्नाटक) लालबाग २०-३५, हापूस (४-५ डझन) ६००-१२००, पायरी (४ डझन) ५००-८००. तोतापुरी - २०-३५, मल्लिका - ३५-४५, कोकण हापूस (४-८ डझन) तयार - २०००-३५००, (८ ते १० डझन) तयार २००० ते ४०००

फुलबाजार
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२५, गुलछडी : ८०-१३०, बिजली : २०-५०, कापरी : १०-३०, मोगरा : २५०-४००, ॲस्टर : ८-१६, (गड्ड्यांचे भाव) गुलाब गड्डी : १०-३०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, लिली बंडल : ६-१०, जरबेरा : ३०-६०, कार्नेशियन : १००-२००.

मटण मासळी
गणेश पेठ येथील मासळीच्या घाऊक बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे ६ टन, खाडीची सुमारे २०० किलो, तर नदीच्या मासळीची सुमारे अडीच टन आवक झाली. तर आंध्रप्रदेश येथून राहू, कतला आणि सिलनची सुमारे १४ टन आवक झाली होती. मासळीची आवक आणि मागणी संतुलित असल्याने दर स्थिर असल्याचे ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

खोल समुद्रातील मासळी 
(प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे १४००- १५००, मध्यम : १०००-१२००, लहान ९००, भिला : ७००, हलवा : ७००-७५०, सुरमई : ७००-७५०, रावस : लहान ६००-६५०, मोठा : ७५०, घोळ : ७५०, करली : ३६०-४००, करंदी  (सोललेली) : ४००, भिंग : ४००, पाला : लहान ७००, मोठा ११००, वाम : पिवळी लहान ४००, मोठे - ८००,  काळी : ३६०, ओले बोंबील :२००-२४०, कोळंबी ः लहान २८०, मोठी : ४८० जंबोप्रॉन्स : १३००, किंगप्रॉन्स : १०००, लॉबस्टर : १५००, मोरी : लहान : १८०, मोठी ४००, मांदेली : १४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २४०-२८०, चिंबोर्या : ५००-६००,

खाडीची मासळी 
सौंदाळे : २४०-२८०, खापी २८०-३२०, नगली : लहान : ४०० मोठी ६००, तांबोशी : ३६०- ४६०, पालू : २८०, लेपा : लहान १६०-२४०, शेवटे : २८० बांगडा : लहान १६०, मोठा २००-२४०, पेडवी : १००, बेळुंजी : १६०-१८०, तिसर्या : २४०, खुबे १४०, तारली : १४०-१६०

नदीची मासळी 
रहू : १४०-१६०, कतला : १८०-२००, मरळ : लहान २८०, मोठे- ४८०, जिवंत मरळ : ६०० -७००, शिवडा : २८०, चिलापी : ८०,  खवली : २८०, आम्ळी : १००-१२० खेकडे : ३६०, वाम : ५५०-६००.

मटण 
बोकडाचे : ४८०, बोल्हाईचे : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०.

चिकन 
चिकन : १६०, लेगपीस : १९०, जिवंत कोंबडी : १३०, बोनलेस : २६०. 

अंडी 
गावरान : शेकडा : ५८०, डझन : ८४ प्रति नग : ७ इंग्लिश : शेकडा : ३१०  डझन : ४८ प्रतिनग : ४

इतर बाजारभाव बातम्या
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...
औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत कारले प्रतिक्विंटल १५०० ते २०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत...जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील...