धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट

राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत पाण्याची कमी आवक होऊ लागली आहे. त्यामुळे कोयना, वारणा, वीर, हतनूर, गोसी खुर्द, दारणा, धोम, कण्हेर अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे.
Decrease in water discharge from dams
Decrease in water discharge from dams

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत पाण्याची कमी आवक होऊ लागली आहे. त्यामुळे कोयना, वारणा, वीर, हतनूर, गोसी खुर्द, दारणा, धोम, कण्हेर अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली भागांत दिलासा मिळाला आहे. 

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. मराठवाड्यात ऊन पडत असल्याने शेतातील पाणीपातळी ओसरली आहे. विदर्भात अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी शिडकावा होत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडाऱ्यातील मोहाडी येथे २४.२ मिलिमीटर पाऊस पडला. गोंदियातील गोरेगाव, सालकेसा, गोंदिया, नागपूरमधील रामटेक येथेही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.  

कोकणातील काही भागांत व घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पालघरमधील जव्हार ५४, मोखेडा ४८.२, विक्रमगड २५, रायगडमधील माथेरान ५३.७, सुधागडपाली ४५ मिलिमीटर पाऊस पडला असून म्हसळा, पेण, पोलादपूर, तळा, खालापूर, माणगाव भागांत हलका पाऊस पडला. रत्नागिरीतील संगमेश्‍वर ४७, राजापूर ३८, चिपळूण ३०, मंडणगड २८ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग २५, ठाण्यातील आंबरनाथ २८.१, भिवंडी २४, कल्याण २५, शहापूर ४०, उल्हासनगर ३५ मिलिमीटर पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातही पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने काहिसा दिलासा मिळत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८०.६ मिलिमीटर पाऊस पडला. तर पाटण ३२.२, कोल्हापुरातील आजरा ३४, गगणबावडा ३५, पन्हाळा ३६, राधानगरी ३९, शाहूवाडी ३५ मिलिमीटर पाऊस पडला. नंदूरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, नाशिकमधील इगतपुरी, ओझरखेडा, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. तर पुण्यातील लोणावळा कृषी येथे ४१.२, पौड ३२, वेल्हे ४० मिलिमीटर पाऊस बरसला.

राज्यात बुधवारी (ता.२८) सकाळपर्यत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये :   भातसा २५, सूर्या धामणी ३५, वैतरणा ५१, पेच तोतलाडोह ७७, गंगापूर, ५०, भंडारदरा, पानशेत ३४, वरसगाव ३८, पवना ३५, नीरा देवघर ४६, धोमबलकवडी ४४, वारणा ४३, दूधगंगा ५९, राधानगरी ३७, कोयना ५१

राज्यातील विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, क्युसेकमध्ये : सूर्या धामणी ५५.६२, गोसी खुर्द ५२७.२०, बेंबळा २०, दारणा ९०.५०, हतनूर २९१, खडकवासा ९७, आंध्रा २७, वीर ४११, धोम ५१, कण्हेर ५१, धोमबलकवडी १५, वारणा २२६, दूधगंगा ५८, राधानगरी ८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com