Agriculture news in Marathi Decrease in water discharge from dams | Agrowon

धरणांतील पाण्याच्या विसर्गात घट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 जुलै 2021

राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत पाण्याची कमी आवक होऊ लागली आहे. त्यामुळे कोयना, वारणा, वीर, हतनूर, गोसी खुर्द, दारणा, धोम, कण्हेर अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे.

पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरू लागल्याने धरणांत पाण्याची कमी आवक होऊ लागली आहे. त्यामुळे कोयना, वारणा, वीर, हतनूर, गोसी खुर्द, दारणा, धोम, कण्हेर अशा धरणांतून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. नद्यांच्या पाणीपातळीत चांगलीच घट झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली भागांत दिलासा मिळाला आहे. 

राज्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत उघडीप दिली आहे. मराठवाड्यात ऊन पडत असल्याने शेतातील पाणीपातळी ओसरली आहे. विदर्भात अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी तुरळक ठिकाणी शिडकावा होत आहे. बुधवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंत भंडाऱ्यातील मोहाडी येथे २४.२ मिलिमीटर पाऊस पडला. गोंदियातील गोरेगाव, सालकेसा, गोंदिया, नागपूरमधील रामटेक येथेही हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.  

कोकणातील काही भागांत व घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पालघरमधील जव्हार ५४, मोखेडा ४८.२, विक्रमगड २५, रायगडमधील माथेरान ५३.७, सुधागडपाली ४५ मिलिमीटर पाऊस पडला असून म्हसळा, पेण, पोलादपूर, तळा, खालापूर, माणगाव भागांत हलका पाऊस पडला. रत्नागिरीतील संगमेश्‍वर ४७, राजापूर ३८, चिपळूण ३०, मंडणगड २८ मिलिमीटर पाऊस पडला. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग २५, ठाण्यातील आंबरनाथ २८.१, भिवंडी २४, कल्याण २५, शहापूर ४०, उल्हासनगर ३५ मिलिमीटर पाऊस पडला.

मध्य महाराष्ट्रातही पावसाने चांगलीच उसंत घेतली आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने काहिसा दिलासा मिळत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक ८०.६ मिलिमीटर पाऊस पडला. तर पाटण ३२.२, कोल्हापुरातील आजरा ३४, गगणबावडा ३५, पन्हाळा ३६, राधानगरी ३९, शाहूवाडी ३५ मिलिमीटर पाऊस पडला. नंदूरबारमधील अक्कलकुवा, तळोदा, नाशिकमधील इगतपुरी, ओझरखेडा, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला. तर पुण्यातील लोणावळा कृषी येथे ४१.२, पौड ३२, वेल्हे ४० मिलिमीटर पाऊस बरसला.

राज्यात बुधवारी (ता.२८) सकाळपर्यत धरणक्षेत्रनिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये :  
भातसा २५, सूर्या धामणी ३५, वैतरणा ५१, पेच तोतलाडोह ७७, गंगापूर, ५०, भंडारदरा, पानशेत ३४, वरसगाव ३८, पवना ३५, नीरा देवघर ४६, धोमबलकवडी ४४, वारणा ४३, दूधगंगा ५९, राधानगरी ३७, कोयना ५१

राज्यातील विविध धरणांतून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग, क्युसेकमध्ये :
सूर्या धामणी ५५.६२, गोसी खुर्द ५२७.२०, बेंबळा २०, दारणा ९०.५०, हतनूर २९१, खडकवासा ९७, आंध्रा २७, वीर ४११, धोम ५१, कण्हेर ५१, धोमबलकवडी १५, वारणा २२६, दूधगंगा ५८, राधानगरी ८०


इतर बातम्या
ऑनलाइन ठिबक योजनेत पुन्हा कागदपत्रांचा...पुणे : कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची परंपरा...
सर्वदूर जोरदार पावसाची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’...
प्रगतिपथावरील जलसंधारण प्रकल्प लवकर...औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य...
‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा...
केळी, संत्रा क्लस्टरमध्ये वर्ध्याचा...वर्धा : केंद्राच्या धर्तीवर राज्याने निर्यात धोरण...
सांगलीत ३० टक्के द्राक्ष फळछाटणी पूर्णसांगली ः जिल्ह्यात यंदाच्या द्राक्ष फळ छाटणीस...
कृषी उत्पन्नवाढीसाठी मागेल  त्या...सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत...
मांजरा नदीला पूर, पाणी पात्राबाहेर निलंगा, जि. लातूर : हवामान विभागाने वर्तवलेल्या...
परभणी जिल्ह्यातील  दोन मंडलांत...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८२...
‘अलमट्टी’ची उंची वाढवू नका ः राजू शेट्टीकोल्हापूर : कोल्हापूर, सांगली व बेळगाव...
ग्रामीण भागाची वीजतोडणी मोहीम...अकोला : अतिवृष्टी सुरू असताना ग्रामीण भागातील...
बोधेगाव परिसराला तिसऱ्यांदा ...नगर : शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरात शनिवारी...
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...