Agriculture news in marathi Decrease in water level of Panchganga river | Agrowon

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 ऑगस्ट 2020

कोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने अनेक धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांतून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

कोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने अनेक धरणांतील पाण्याचा विसर्गही कमी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणाच्या दोन दरवाजांतून ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यापैकी विद्युत विमोचकातून १४००, सांडव्यातून २८५६ असा एकूण ४२५६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

शनिवारी (ता. ८) सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत गगनबावड्यात सर्वाधिक ९७ मि.मी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात अद्यापही ८५ बंधारे पाण्याखाली आहेत. शनिवारी सकाळपर्यंत २३ गावांतील पाच हजार व्यक्तींनी स्थलांतर केले आहे.

दरम्यान, पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणांचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. पंचगंगा नदीच्या पाण्यातही गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत एक फुटांनी घट झाली आहे. दुपारी बारा वाजता मिळालेल्या आकडेवारीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४४ फुट ४ इंच इतकी आहे. नदीच्या पात्रात घट होत असल्याने बंधारेही मोकळे होत आहेत.

गेल्या दोन दिवसांत सुमारे वीस बंधाऱ्यावरील पाणी हटल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांवर स्थानिक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यास पाणी येते. 

बंधारे झाले खुले 

सध्या केवळ धरणांतून सोडलेले पाणीच येत असल्याने पाण्याखाली गेलेले बंधारे खुले झाले आहेत. धरणक्षेत्राचा अपवाद वगळता जिल्ह्यात शनिवारी (ता.८) दिवसभर पावसाची उघडझाप राहिली. पाणी कमी होऊ लागल्याने नदीकाठावरील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडल्याचे चित्र होते.   
 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार...पुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान...
सोलापूर जिल्ह्यात पीक विमा नुकसान...सोलापूर : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
नुकसान भरपाई देण्यास सरकार कटिबद्ध :...औरंगाबाद  : ‘‘आता झालेल्या पावसाने...
कांदा बियाणे मिळवण्यासाठी अकोल्यात...अकोला ः रब्बी कांदा लागवडीची लगबग सुरु झाली...
लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा...लातूर ः या वर्षी सुरवतीपासून चांगला पाऊस होत...
जळगाव जिल्ह्यात मक्याची ९० हजार...जळगाव  ः खानदेशात ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा...
आजरा तालुक्‍यात भात कापणी सुरूआजरा, जि. कोल्हापूर ः आजरा तालुक्‍यात भात...
कारखानदारांना वाढत्या साखर साठ्याची...मुंबई  : राज्यात गेल्या गाळप हंगामातील ७२...
धानावरील तुडतुड्यांचे वेळीच व्यवस्थापन...नागपूर  : ‘‘सद्यास्थितीत पूर्व विदर्भात...
‘बाभळी’तील पाणी अडविण्यासाठी प्रयत्न...नांदेड : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीकविम्यासाठी कंपनीकडे...नांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पुराच्या...
जायकवाडी प्रकल्पातून ५५ टीएमसी पाण्याचा...औरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून गत २५...
सांगली जिल्ह्यात सोयाबीनचे उत्पादन...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा...
आता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’...नागपूर  : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर...
कुलगुरू निवड निकषांबाबत प्र-कुलपतींच्या...पुणे : कुलगुरू निवड निकषांच्या बदलाबाबत कुलपती...
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना...मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील...
कापूस खरेदीचे प्रभावी नियोजन करावे ः...मुंबई : आगामी हंगामामध्ये राज्यात सुमारे ४५० लाख...
ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ कार्यान्वित...मुंबई : लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार...
सीमाभागातील साखर कारखान्यांचे मजूर...कोल्हापूर : जिल्ह्यात ऊस तोडणी मजुरांचे आगमन होत...
जळगावात उडदाला ७५०० रुपये क्विंटल दरजळगाव  ः एकीकडे अतिपावसाने उडदाचे मोठे...