सांगलीत भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट
सांगलीत भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट

सांगलीत भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट

सांगली ः गेल्या तीन वर्षांत पर्जन्यमान कमी झाल्यामुळे दिवसेंदिवस भूजलपातळीत मोठी घट होत आहे. गेल्या पाच वर्षांपासून दरवर्षीच ही पातळी घटत चालली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या अहवालानुसार जिल्ह्याच्या भूजल पातळीत सरासरी दीड फुटाने घट झाली असून, दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या तालुक्यातील घट वेगाने वाढत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मान्सूनने दगा दिल्याने जिल्ह्यातील पर्जन्यमानातही घट जाणवत आहे. यंदाही पावसाची सरासरी गाठली नसल्याने नैसर्गिक संकट वाढत आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाणी योजनांतून आवर्तन सुरू असून त्याचा फायदाही होत आहे. मात्र, पाऊसही कमी आणि योजनांचे पाणी न पोचलेल्या भागातील भूजल पातळी घटतच चालली आहे. 

भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यात ८४ निरीक्षण विहिरींचा अभ्यास करून भूजल पातळीचा आलेख तयार करण्यात आला आहे. मार्च महिन्यातील अहवालानुसार जिल्ह्यात जत तालुक्यातील भूजल पातळीत सव्वा मीटरने घट झाली आहे. त्यानंतर आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही हेच संकट निर्माण झाले आहे. ज्या भागात म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेचे पाणी पोचले आहे, त्या ठिकाणी मात्र, पाणी पातळी स्थिर असली तरी ती समाधानकारक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यातील सिंचन योजना आहेत. त्यातून कोरडे पडलेले तलाव भरून घेतल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी जिल्ह्यातील तलावात केवळ १८ टक्केही पाणीसाठा शिल्लक नसल्याचे चित्र आहे.जिल्ह्याच्या पाऊसमानाचा विचार केला, तर मान्सूनवर भरवसा असला तरी त्याचेही प्रमाण घटतच चालले आहे. त्यात जत, आटपाडीसह काही भागाला परतीच्या मान्सूनवर अवलंबून राहावे लागत आहे. टंचाई परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी टॅँकरसह इतर उपाययोजना केल्या आहेत.

जिल्ह्यातील भूजल पातळीची स्थिती...(मीटरमध्ये) 
तालुका पाच वर्षाची सरासरी वाढ किंवा घट 
मिरज ६.४८ १.११ (वाढ) 
पलूस ४.२ ०.४३ ( वाढ) 
जत ६.४७ -१.५१ (घट) 
खानापूर ६.४४ -०.८७ (घट) 
क. महांकाळ ६.५४ -०.८५ ( घट) 
तासगाव ८.२० -०.८७ (घट) 
शिराळा ३.०० -०.२० (घट) 
आटपाडी ५.९८ -०.९२ (घट) 
कडेगाव ६.२४ - ०.१३ (घट)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com