Agriculture news in marathi Decreased rainfall in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात पावसाचा जोर कमी

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 जुलै 2020

औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत काही मंडळांचा अपवाद वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कन्नड व हरसूल या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत काही मंडळांचा अपवाद वगळता पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यातील कन्नड व हरसूल या दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. त्याशिवाय बहुतांश मंडळांत तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला. काही मंडळांत मध्यम पावसाने हजेरी लावली.

औरंगाबाद जिल्ह्यातील ५० मंडळांत पावसाची तुरळक ते हलक्‍या स्वरूपाची हजेरी लागली. काही मंडळांत मध्यम पाऊस झाला. तर, कन्नड व हरसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील २९ मंडळांत तुरळक, हलका मध्यम पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील २१ मंडळात झालेला पाऊस एक मंडळांतील मध्यम वगळता तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा होता. 

हिंगोली जिल्ह्यातील १६ मंडळांत झालेला पाऊस तुरळक ते हलक्‍या स्वरूपाचा होता. नांदेड जिल्ह्यातील ५२ मंडळांत पावसाची हजेरी लागली. परंतु, नऊ मंडळांचा अपवाद वगळता सर्वच मंडळांत तुरळक, हलका पाऊस नोंदला गेला. बीड जिल्ह्यातील ४४ मंडळांत, लातूर जिल्ह्यातील ३३ मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. दोन मंडळांत मध्यम पावसाची हजेरी लागली. उस्मानाबाद जिल्ह्यातील नऊ मंडळांत तुरळक पावसाची नोंद झाली.  

जिल्हानिहाय पावसाची मंडळे  (पाऊस मि.मी)

औरंगाबाद जिल्हा ः सिल्लोड २२.८, चिकलठाणा २६.५. जालना जिल्हा ः अनवा ३४, जालना शहर २१.३, विरेगाव ५०, अंबड २२.८, धनगर पिंपरी २१.३, श्रीष्टी ४६.५, घनसावंगी ५६.८,  कुंभार पिंपळगाव २४.६, रांजणी २२.८, जांबसमर्थ ४२.८. परभणी जिल्हा ः जांब २९.३. नांदेड जिल्हा ः लिंबगाव ४५.८, सगरोळी २७.८, किनवट ६०, इस्लामपूर २१, जलधारा २१, देहली २१, सरसम ३५.१, जवळगाव ५२.३, नरसी २०, बीड जिल्हा ः विडा ३३.५, बर्दापूर २३.३, लोखंडी ६१.५, तलवाडा ५६.८. लातूर जिल्हा ः झरी २२.३, हलगरा ३५.५.

अतिवृष्टीची मंडळे (पाऊस मि.मी)

कन्नड ६८
हर्सूल ८१.३

 


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...