मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कमीच राहिला. नांदेड, जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील काही मंडळांत दखलपात्र पावसाची नोंद झाली.
Decreased rainfall in Marathwada
Decreased rainfall in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाचा जोर कमीच राहिला. नांदेड, जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यातील काही मंडळांत दखलपात्र पावसाची नोंद झाली.

परभणी जिल्ह्यातील ३४, उस्मानाबाद २९, नांदेड ५६, लातूर ४९, जालना ३७,  हिंगोली ३०, बीड ५०, तर औरंगाबाद जिल्ह्यातील ४० मंडळांत तुरळक, हलका पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील पेडगाव मंडळांत २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम मंडळात २०.३, नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी मंडळात २७, माहूर २७.८, वानोळा २३, वाई ३२.५, सिंदखेडमध्ये २७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

लातूर जिल्ह्यातील औराद मंडळात ३०.५, हलगरा २९.५, तर वाढवणा मंडळात ३४.३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातील धावडा मंडळात ४३.३, राजूर ५७.५, वाघरुळ ३८, पाचनवडगाव ४५.३, तर अंबड मंडळात ३९.८ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात धारूर मंडळात ३८.८, तेलगाव २०.५, विडा २२.८, अंबाजोगाई ३१.५, पिंपळा २७.३, पाली २५.३, तर पिंपळनेर मंडळांत २० मिलिमीटर पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील आळंद मंडळात ३०.८, महालगाव २०.५, वैजापुर २२.५, विहामांडवा ३६.५, पाचोड २४, पैठण ३७.८, नांदर ३३.३, तर बालानगर मंडळात ३६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेड, परभणी, हिंगोलीत ८१ मंडळांमध्ये पाऊस 

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ८१ मंडळांमध्ये बुधवारी (ता.१५) सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील नांदेड, हादगाव, माहूर, किनवट, हिमायतनगर, भोकर, उमरी, धर्माबाद, देगलूर, कंधार, लोहा या अकरा तालुक्यातील ४६ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. माहूर, किनवट तालुक्यातील मंडळांमध्ये पावसाचा जोर होता. अन्य पाच तालुक्यांत मात्र पावासाने ओढ दिली.

परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, पालम तालुक्यातील २० मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील १५ मंडळांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. अन्य मंडळांमध्ये उघडीप होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com