agriculture news in Marathi, Decreased water level in dam | Agrowon

परभणी : धरणांच्या जलाशयातील उणे पाणीसाठा घटतोय
टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 मे 2019

परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या वाऱ्यामुळे वाढलेला बाष्पीभवनाचा वेग आदी कारणांनी मोठ्या, मध्यम प्रकल्पांच्या धरणांच्या जलाशयातील उणे उपयुक्त पाणीसाठ्यात मध्ये दिवसागणिक घट होत आहे. जलस्रोत झपाट्याने तळ गाठत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त लोकवस्त्यांची संख्या वाढत चालली आहे.

परभणी ः वाढते तापमान, बेसुमार उपसा, वेगाच्या वाऱ्यामुळे वाढलेला बाष्पीभवनाचा वेग आदी कारणांनी मोठ्या, मध्यम प्रकल्पांच्या धरणांच्या जलाशयातील उणे उपयुक्त पाणीसाठ्यात मध्ये दिवसागणिक घट होत आहे. जलस्रोत झपाट्याने तळ गाठत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त लोकवस्त्यांची संख्या वाढत चालली आहे.

पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्यामुळे यंदा जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना या मोठ्या प्रकल्पांसह मासोळी, करपरा या मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षीपेक्षा खूप कमी उपयुक्त पाणीसाठा जमा झाला होता. त्यात नदीपात्रात तसेच कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्यामुळे मोठ्या प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा लवकरच संपुष्टात आला. त्यामुळे या धरणामध्ये केवळ मृत पाणीसाठा शिल्लक राहिला होता. एप्रिल महिन्यापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. मे महिन्यात एकीकडे अनेक ठिकाणी ४२ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा पारा वर गेला आहे. तर दुसरीकडे जलाशयामधून पंपाद्वारे अवैधरीत्या बेसुमार पाणीउपसा सुरूच आहे. त्यामुळे उणे उपयुक्त पाणीसाठ्यातून मोठी घट सुरू आहे.

रविवारी (ता. २६) पैठण येथील जायकवाडी धरणांमध्ये -६.३९ टक्के, माजलगाव धरणात -२१.४६ टक्के, येलदरी धरणामध्ये -३.७३ टक्के, सिद्धेश्वर धरणामध्ये -४३.१३ टक्के, निम्न दुधना धरणामध्ये -११.७७ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. करपरा आणि मासोळी मध्यम प्रकल्पांतील मृत पाणीसाठ्यातदेखील मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील २२ पैकी १० लघू तलाव आटले आहेत. ९ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. फक्त ३ लघू तलावांमध्ये सरासरी १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. 

प्रकल्पांचे जलायशये तळ गाठत असल्यामुळे धरणांच्या काठी असलेल्या नळपाणीपुरवठा योजनांच्या उद्भव विहिरींना पाणी नसल्यामुळे अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये जनावराच्या पाण्याचे संकट अधिक गंभीर झाले आहे.

इतर ताज्या घडामोडी
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...
कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त...अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून...
पहुर्जीरा गावात पाण्यात बैलगाडी उलटलीबुलडाणा  : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत विविध करारः...मुंबई: राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यात हलक्या ते मध्यम...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
मालेगाव तालुक्यात पावसामुळे पिके भुईसपाटनाशिक : मालेगाव तालुक्यातील सौंदणे गावाच्या...
पुणे जिल्ह्यात दोन हजार ३५४ पीककापणी...पुणे ः पिकांची उत्पादकता आणि पीकविमा नुकसानभरपाई...
छावण्या सुरू ठेवण्यासाठी शेवगावात आंदोलननगर ः शेगाव तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अजूनही...
आघाडीचे सरकार आल्यास सरसकट कर्जमाफी ः...जालना : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या...
नगरमध्ये कांदा प्रतिक्विंटल कमाल पाच...नगर : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकच्या सभेत पंतप्रधानांकडून ज्वलंत...नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
साताऱ्याच्या दुष्काळी भागात दुसऱ्या...सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव तालुक्‍...
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे १०० जागा...मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र...
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची...मुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता...