Agriculture news in Marathi Dedication of Mahabeej's solar powered warehouse | Agrowon

महाबीजच्या सौर ऊर्जाचलित गोदामाचे लोकार्पण

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे शिवणी येथे उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा चलित वातानुकूलित व आर्द्रताविरहीत गोदाम प्रकल्पाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

अकोला ः महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाद्वारे शिवणी येथे उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा चलित वातानुकूलित व आर्द्रताविरहीत गोदाम प्रकल्पाचे लोकार्पण ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते उद्घाटन झाले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले, महाबीजचे अनिल भंडारी, महाबीजचे संचालक वल्लभराव देशमुख उपस्थितीत होते.

हा प्रकल्प सौर ऊर्जेवर आधारित असून देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील बियाणे उत्पादक महामंडळापैकी प्रथमच अशा प्रकारचा प्रकल्प बनविण्यात आला आहे. सदर प्रकल्पामध्ये बियाण्याचा दर्जानुसार साठवणूक करण्याकरिता आर्द्रता व तापमानानुसार सहा स्वतंत्र दालने तयार करण्यात आली आहेत.

या प्रकल्पामुळे अतिशय महत्त्वाचे मूलभूत, पायाभूत, भाजीपाला, तसेच प्रमाणित बियाणे साठवणूक केल्यावर बियाण्याची उगवणशक्ती व जोम अधिक कालावधीकरिता टिकून ठेवणे शक्य होईल. गोदाम कार्यान्वित झाल्यामुळे मौल्यवान बियाण्याची वातावरणामुळे होणारी हानी रोखून गुणवत्ता राखता येईल व पुढील हंगामासाठी सदर बियाणे उपयोगात आणता येईल.

श्री. भंडारी यांनी सदर प्रकल्पास राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे अर्थसहाय तसेच महाबीजच्या स्वनिधीमधून तयार झाल्याचे सांगितले. कृषिमंत्री भुसे यांनी सदर प्रकल्पामुळे दर्जेदार व गुणवत्तापूर्वक बियाण्याची साठवणूक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच या प्रकल्पामध्ये सौरऊर्जेचा वापर होत असल्यामुळे पर्यावरणाची हानी कमी होण्यास मदत होईल, असे सांगितले.


इतर बातम्या
चक्रीवादळांचा तडाखा यंदा वाढलापुणे : चक्रीवादळ निर्मिती नैसर्गिक असली, तरी...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
साखरेची ‘एमएसपी’पेक्षा कमी किमतीने मागणीकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेची विक्री...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
काजू उत्पादकांना दिलासामुंबई : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील काजू...
का येताहेत चक्रीवादळे? भारताच्या पूर्व भागात असलेला बंगालचा उपसागर,...
कृषी कायद्यांविरोधात राज्यात...पुणे ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी आणि पणन...
किसान समन्वय समितीचा अकोले येथे मोर्चा नगर ः केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
दक्षिण भारतात मुसळधार पाऊसपुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेले बुरेवी...
खत विक्रीत वाढपुणे : देशात कोविड १९ ची समस्या तसेच लॉकडाउन...