मुंबई : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, केंद्र सरकारचे तीन नव्या कृषी कायद्यांना विरो
अॅग्रो विशेष
बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती
दक्षिण बंगालचा उपसागरात रविवारी (ता.२९) या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज (ता.१) हा तीव्र कमी दाबाचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे.
पुणे : निवार चक्रीवादळाचा प्रभाव निवळत असताना पुन्हा बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. या क्षेत्राची तीव्रता वाढत असून त्याचे रूपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम पुन्हा राज्यातील वातावरणावर होणार असल्याने हवामानात वेगाने बदल होत आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीत चढउतार राहणार असून काहीशी बोचरी थंडी असण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
दक्षिण बंगालचा उपसागरात रविवारी (ता.२९) या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. सोमवारी (ता.३०) ते श्रीलंकेतील त्रिकोमालीपासून पूर्व दक्षिणपूर्व भागात ७५० किलोमीटर अंतरावर होते. तर कन्याकुमारीपासून पूर्व दक्षिणपूर्व भागात ११५० किलोमीटर अंतरावर होते. आज (ता.१) हा तीव्र कमी दाबाचे चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता असून ते पश्चिम वायव्य भागाकडे श्रीलंकेजवळून सरकण्याची शक्यता आहे.
बुधवारी आणि गुरुवारी या कोमोरिन परिसरातून पश्चिमेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण तमिळनाडू, पुदुचेरी, आंध्रप्रदेशाची किनारपट्टी, माहे आणि कराईकल आणि दक्षिण उत्तर केरळ या भागात उद्यापासून ते शुक्रवारपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी दरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि २.१ किलोमीटर उंचीवर आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. यामुळे पश्चिम राजस्थान भागातील चुरू येथे ४.१ अंश सेल्सिअसची देशातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. इतर हरियाना, चंदीगड, दिल्ली, राजस्थान या भागात सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे. त्यामुळे या भागात कडाक्याची थंडी असून राज्यातही काही भागातही थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे सकाळी काहीशी थंडी असली तरी दुपारी ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका वाढत असून किमान तापमानात चांगलीच वाढ होत आहे
.
विदर्भात किंचित थंडी
राज्यात काही अंशी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. मात्र, काही भागात हवामान कोरडे असल्याने तुरळक ठिकाणी किंचित थंडी असल्याने नागरिकांना हवीहवीशी वाटत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे. परंतु विदर्भातील काही भागात थंडी असल्याने सोमवारी (ता.३०) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १३.८ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
सोमवारी (ता.३०) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सअसमध्ये : मुंबई (सांताक्रुझ) २२.२ (२), ठाणे २५.०, रत्नागिरी २३.० (२), डहाणू २२.५ (३), पुणे १७.८ (५), जळगाव १९.० (६), कोल्हापूर २०.४ (४), महाबळेश्वर १६.५ (२), मालेगाव १९.२ (७), नाशिक १७.० (५), निफाड १८.२, सांगली २०.३ (५), सातारा १८.५ (४), सोलापूर १९.६ (३), औरंगाबाद १८.० (५), परभणी १८.४ (४), परभणी कृषी विद्यापीठ १७.४, नांदेड १९.० (५), अकोला १९.५ (४), अमरावती १६.१ (-१), बुलडाणा १८.८ (३), चंद्रपूर १९.२ (४), गोंदिया १३.८ (-१), नागपूर १५.६ (१), वर्धा १७.५ (२), यवतमाळ १८.५ (३)
- 1 of 657
- ››