शेतकऱ्यांनी ई-नामचा आग्रह धरावा ः दिपक तावरे

शेतकऱ्यांनी ई-नामचा आग्रह धरावा ः दिपक तावरे
शेतकऱ्यांनी ई-नामचा आग्रह धरावा ः दिपक तावरे

पुणे : आपला शेतमाल देशात कुठेही विक्री होऊन, शेतमालाला अपेक्षित दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी ई-नामचा आग्रह धरत, डिजिटल मार्केटींग आत्मसात करावे, असे आवाहन पणन संचालक दीपक तावरे यांनी केले.  आॅनलाईन राष्ट्रीय कृषी बाजाराची (ई-नाम) सुरवात मुंबई बाजार समितीमध्ये झाली आहे. यासाठीची आवश्‍यक असणाऱ्या ई-लिलाव गृह आणि असेईंग लॅबचे (शेतमालाचा दर्जा तपासणी प्रयोगशाला) उदघाटन नुकतेच तावरे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, बाजार समितीचे प्रशासक आणि प्रभारी सहकार आयुक्त सतिष सोनी, सचिव अनिल चव्हाण, सहसचिव अशोक गाडे, अविनाश देशपांडे, कार्यकारी अभियंता आर. आर. खिस्ते, एस. एम. मोहाडे, उपअभियंता एम. के. बेपारी, मुख्यलेखाधिकारी मंदार साळवी आदी अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.  तावरे म्हणाले, ई-नाम मुळे देश ही एक बाजारपेठ झाली आहे. यामाध्यमातून देशाच्या कुठल्याही भागातून कोणत्याही बाजार समितीमधील शेतमाल खरेदी विक्री करता येणार आहे. अशा प्रकारच्या आॅनलाईन लिलावामध्ये स्पर्धा निर्माण होणार असून, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला अपेक्षित बाजारभाव मिळणे शक्य होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांनी इ नाम प्रणाली आत्मसाद करून, शेतमाल आॅनलाईन पद्धतीनेच विक्री करण्याचा आग्रह धरणे आवश्‍यक आहे.   सुनील पवार म्हणाले, बाजार समितीने  ई लिलाव गृह आणि प्रयोगशाळा इतर बाजार समित्यांना दिशादर्शक ठरणार असून, राज्यासह देशातील सर्व बाजार समित्यांमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगशाळा निर्माण झाल्यास शेतकरी आणि ग्राहकांना यामाध्यमातून फायदा होणार आहे. प्रशासक सोनी म्हणाले, ई नाम द्वारे होणाऱ्या शेतमालाच्या लिलावामध्ये प्रयोगशाळेमध्ये तपासलेला दर्जेदार शेतमाल ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. शेतमालाच्या दर्जामुळे शेतकऱ्यांनादेखील चांगले दर मिळणार असून, शेतकऱ्यांनी पारदर्शी सेवा मिळणार आहे.‘‘ पणनमंत्र्यांकडून कौतुक  ई लिलावगृह आणि प्रयोगशाळेला सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली. या वेळी शेतकऱ्यांनी आॅनलाईन लिलावासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. दरम्यान, पहाटे बाजार समित्यांच्या विविध विभागांना भेटी देऊन विविध घटकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या वेळी आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील, व्यापारी प्रतिनिधी संजय पानसरे, बाळासाहेब बेंडे, चंद्रकांत ढोले, शंकर पिंगळे आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com