नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत करडईच्या पेरणी क्षेत्रात घट
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत करडईच्या पेरणी क्षेत्रात घट

नांदेड : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये यंदा करडईच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये यंदा करडईची ३ हजार ५६९ हेक्टरवर (९.७१टक्के) पेरणी झाली आहे.

रब्बी हंगामातील कोरडवाहू क्षेत्रातील प्रमुख गळीत धान्य पीक असलेल्या करडईचे नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण क्षेत्र ३६ हजार ७४२ हेक्टर आहे. २०१८ च्या पावसाळ्यामध्ये या तीन जिल्ह्यांमध्ये आॅगस्टमध्येच पाऊस गायब झाला. त्यामुळे या तीन जिल्ह्यांमध्ये ३ हजार ५६९ हेक्टरवर करडईची पेरणी झाली. काही वर्षापूर्वी या तीन जिल्ह्यांतील शेतकरी विशेषतः कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी ज्वारीमध्ये करडईचे आंतरपीक घेत असत.

अनेक शेतकरी करडईची सलग पेरणी करत असत. परंतु गेल्या काही वर्षामध्ये हरभरा या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. गेल्या काही वर्षामध्ये या तीन जिल्ह्यांंमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन नंतर रब्बीमध्ये हरभरा घेतला जात आहे. त्यामुळे हरभऱ्याचे क्षेत्रात वाढ झाली आहे. ज्वारीचे क्षेत्रही तुलनेने कमी होत आहे. त्यामुळे करडईच्या क्षेत्रामध्येदेखील घट होत आहे.

यंदा महिनाभर आधी पाऊस गायब झाल्याने करडई पेरणी साठी आवश्यक ओलावा जमिनीत नसल्याने करडईच्या क्षेत्रात घट झाली. नांदेड जिल्ह्यात करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ७६८ हेक्टर आहे परंतु प्रत्यक्षात ६५६ हेक्टरवर पेरणी झाली. बिलोली तालुक्यात करडईचे पेरणी क्षेत्र आहे. परभणी जिल्ह्यात करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १३ हजार ७८८ हेक्टर आहे. परंतु यंदा २ हजार ७४३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सेलू, परभणी, गंगाखेड, जिंतूर या तालुक्यांमध्ये करडईचे पेरणी क्षेत्र अधिक आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये करडईचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार १८६ हेक्टर आहे. परंतु यंदा प्रत्यक्षात १७० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यात करडईचे पेरणी झाली.  

रब्बी हंगाम २०१८-१९ जिल्हानिहाय करडई पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये)
जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
नांदेड ४७६८ ६५६ १३.७६
परभणी १३७८८ २७४३ १९.८९
हिंगोली १८१८६ १७० ०.९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com