खानदेशातील प्रमुख प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट

खानदेशातील प्रमुख प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट
खानदेशातील प्रमुख प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट

जळगाव : खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. जळगाव जिल्ह्यातील गिरणामधून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन नुकतेच सोडण्यात आले. वाघूरमधूनही पाणीवापर सुरू आहे. परिणामी, जलसाठ्यांचा उपयोग यंदा रब्बी हंगामासाठी कमी व पिण्याच्या पाण्यासाठी अधिक होईल, असे चित्र आहे.

वाघूर प्रकल्प ४६ टक्के भरला. त्यातून जळगाव, जामनेर शहरासह उद्योगालाही पाणीपुरवठा केला जातो. भुसावळ, जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याची मागणी केली. या प्रकल्पातील जलसाठा ४० टक्‍क्‍यांवर आहे. रब्बी हंगामासाठी फक्त दोनच आवर्तने या प्रकल्पातून मिळू शकतील, अशी स्थिती आहे. गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी जळगाव तालुक्‍यातील शेवटच्या भागापर्यंत नदीत पाणी सोडण्यात आले. अनेक गावे, शहरांचा पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून आहे. त्यातील जलसाठा कमी होऊन तो ४१ टक्‍क्‍यांवर पोचला आहे.

रावेर तालुक्‍यातील अभोरा, मंगरूळ व सुकी हे प्रकल्प १०० टक्के भरले. त्यातील पाण्याचाही वापर झाला आहे. या प्रकल्पांत आता ९० टक्‍क्‍यांपेक्षा कमी साठा आहे. यावल तालुक्‍यातील मोर प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा पावसाळ्याच्या शेवटी होता. तो आता ४८ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्पात पाच टक्के साठा होता. त्याची वाटचाल शून्याकडे सुरू आहे.

जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील हिवरा, अग्नावती प्रकल्पांमध्ये प्रत्येकी २३ व ६५ टक्के जलसाठा होता. तो प्रत्येकी सहा टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे. भोकरबारी, बहुळा, मन्याड, बोरी, अंजनी हे प्रकल्प कोरडेठाक आहेत. चोपडा तालुक्‍यातील गूळ प्रकल्पातूनही नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यात ५० टक्‍क्‍यांपर्यंत साठा आहे. मुक्ताईनगर व रावेरनजीकच्या हतनूर प्रकल्पात १०० टक्के जलसाठा होता. त्यातून नदीत कालव्यात पाणी सोडले. हा साठा ८० टक्‍क्‍यांखाली आहे. तीन आवर्तने हतनूरमधून मिळतील, अशी अपेक्षा होती. परंतु पुढे किती आवर्तने मिळतील, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

धुळे जिल्ह्यातील अनेर प्रकल्प ८६ टक्के भरला. त्यातही आता ७८ टक्के साठा आहे. करवंद व पांझरा प्रकल्प जवळपास १०० टक्के भरले तो साठा सध्या ८५ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. बुराई प्रकल्प कोरडाच राहिला होता. नंदुरबारमधीर दरा प्रकल्पातील साठाही कमी झाला असून, तो ७५ टक्‍क्‍यांवर आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com