agriculture news in Marathi, Dehugaon-Lohgaon in the bye-elections with a tricolor | Agrowon

देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 मार्च 2019

पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार रूपेश बबन चव्हाण, राष्ट्रवादीचे मच्छिंद्र गणपत चव्हाण, शिवसेना शैला राजू खंडागळे रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. 

पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने रिक्त झालेल्या जिल्हा परिषदेच्या देहूगाव-लोहगाव गटाच्या पोटनिवडणुकीसाठी २४ मार्च रोजी मतदान होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे उमेदवार रूपेश बबन चव्हाण, राष्ट्रवादीचे मच्छिंद्र गणपत चव्हाण, शिवसेना शैला राजू खंडागळे रिंगणात असल्याने तिरंगी लढत होणार आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या हवेली तालुक्यातील गट क्र. ३५ देहू- लोहगाव हा गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या गटातून निवडून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या मंगल नितीन जंगम यांचे सदस्यत्व रद्द ठरवण्यात आल्याने रिक्त झालेला जागेवर पोटनिवडणूक होत आहे. तत्कालीन उमेदवार शैला राजू खंडागळे यांनी तक्रार केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगल जंगम यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळले गेले होते. 

पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून उषा चंद्रकांत चव्हाण आणि मच्छिंद्र गणपत चव्हाण यांचे उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. १८) उषा चव्हाण यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीकडून मच्छिंद्र गणपत चव्हाण रिंगणात आहेत. 

रविवारी (ता. २४) मतदान होणार असून, ९ हजार ६०६ पुरुष, तर ८ हजार ९९५ महिला असे एकूण १८ हजार ६०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोमवारी (ता. २५) जिल्हा परिषदेच्या जून्या इमारतीतील महात्मा गांधी सभागृहात मतमोजणी होणार आहे, निवडणूक निर्णय अधिकारी, तथा तहसीलदार हवेली कार्यालयातर्फे सांगण्यात आले.


इतर बातम्या
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
नगर जिल्ह्यामध्ये कमी पाण्यावरील फळझाडे...नगर : पाच वर्षांपासून दुष्काळाशी सामना करताना...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...
पिंपळनेरला कांदा मार्केट दोन मार्चला...पिंपळनेर, जि. धुळे : शेतीमाल विक्रीनंतर...
महिला बचत गट आर्थिक प्रगतीचा मार्ग ः...सोलापूर  ः  महिला बचतगट हे ग्रामीण...
जळगाव जिल्ह्यात रब्बीचा पेरा १७१ टक्केजळगाव  ः रब्बी हंगामातील उत्पादनाची...