agriculture news in marathi dehydration of fruits and vegetables | Agrowon

फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते फायद्याचे

राजेंद्र वारे
शनिवार, 18 एप्रिल 2020

निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून पाण्याचे प्रमाण विविध प्रक्रिया करून काढले जाते. फळे,पालेभाज्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी निर्जलीकरण पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो.
 

निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून पाण्याचे प्रमाण विविध प्रक्रिया करून काढले जाते. फळे,पालेभाज्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी निर्जलीकरण पद्धतीचा वापर फायदेशीर ठरतो.

फळे व भाजीपाला काढणीनंतर काही काळातच त्यांचा ताजेपणा कमी होऊन खराब होण्यास सुरवात होते. त्यामुळे प्रक्रिया करून त्यांची गुणवत्ता टिकविणे आवश्यक आहे. फळे व भाजीपाला नाशवंत स्वरूपाचा असल्याने त्यांच्या काढणीनंतर त्वरित विक्री करावी लागते. हंगामात फळे व भाजीपाल्यांची आवक जास्त झाल्यास त्यांचे दर कमी होतात. शेतमालावर प्रक्रिया केल्यास किमतीच्या चढ उतारावर नियंत्रण ठेवता येते. याशिवाय हंगामी भाज्या ग्राहकांना बिगर हंगामात उपलब्ध होऊ शकतात. निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून पाण्याचे प्रमाण विविध प्रक्रिया करून काढले जाते. फळे, पालेभाज्यांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी निर्जलीकरण पद्धतीचा वापर केला जातो. पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यामध्ये सूक्ष्मजीवाणुंची वाढ होत नाही.

निर्जलीकरणाचे प्रकार 

 • सोलर ड्राइंग
 • कन्व्हेंशनल हॉट एअर ओव्हन ड्राइंग
 • बॅच ड्राइंग
 • ड्रम ड्राइंग
 • फ्रिज ड्राइंग
 • शुगर इन्फ्युजन ड्राइंग
 • व्हॅक्युम ड्राइंग

निर्जलीकरण पद्धतीची निवड 

 • फळे आणि पालेभाज्यांचे निर्जलीकरण करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. उत्पादित मालास अनुसरून योग्य निर्जलीकरण प्रक्रिया पद्धतीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.
 • निर्जलीकरण पद्धतीची निवड करतेवेळी उत्पादनातील घटकांचा विचार करावा. कच्च्या मालाचा दर्जा, त्यात असणारे घटक, उत्पादनाचा रंग, चव, पाण्याचे प्रमाण या सर्व बाबींचा विचार करणे आवश्‍यक आहे.
 • निर्जलीकरण करतेवेळी पाण्याचे प्रमाण प्रक्रिया करून कमी केले जाते. मात्र या प्रक्रियेदरम्यान मालाचा रंग, वास, चव यामध्ये बदल घडणार नाही याची काळजी घेणे आवश्‍यक असते.
 • प्रक्रियेसाठी स्वच्छ आणि ताज्या असलेल्या फळे व पालेभाज्यांची काढणी केली जाते. हा भाजीपाला रेफर मध्ये ठेवून प्रोसेसिंग सेंटरपर्यंत आणला जातो. त्यानंतर या कच्च्या मालाची गुणवत्ता तपासली जाते. प्रक्रियेसाठी योग्य असलेल्या माल चांगला धुतला जातो. त्यानंतर प्रक्रियेसाठी आवश्‍यक नसलेल्या गोष्टी बाहेर काढून उरलेला माल पुढील प्रक्रियेसाठी पाठविला जातो.
 • नियंत्रित तापमानावर या मालावर ब्लांचिंग किंवा पाश्‍चरायझेशनची प्रक्रिया केली जाते. त्यानंतर वेगवेगळ्या निर्जलीकरण पद्धतींचा वापर करून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाते. तयार माल आवश्‍यक आकाराच्या पॅकिंग मध्ये पॅक केला जातो. बाजारातील मागणीनुसार साठवण केलेला माल विक्रीसाठी पाठविला जातो.

प्रक्रिया -

 माल धुणे, वाळविणे व त्याचे काप करणे
(फळे आणि पालेभाज्यांच्यानुसार)
|
ब्लांचींग, पाश्‍चरायझेशन, कुकिंग (आवश्यकतेनुसार)
|
शुगर सिरप (४० ते ६० ब्रिक्स) मध्ये बुडवून ठेवणे (आवश्यकतेनुसार)
|
साफ करून वाळविणे
|
आवश्‍यक आकारामध्ये पॅक करणे
|
साठवणूक
|
मागणीनुसार बाजारात विक्रीसाठी पाठविणे
 

आवश्‍यक यंत्रसामुग्री

 • माल धुण्यासाठी वॉशर
 • प्रतवारी करण्यासाठी टेबल किंवा सॉर्टिंग कन्व्हेअर बेल्ट
 • सोकिंग टँक किंवा व्हेसल
 • बोईलींग टँक किंवा बँकिंग टँक लांचर
 • ड्रॉइंग युनिट (अद्ययावत तंत्रज्ञानासह)

इतर

 • वजन काटे
 • काप करण्याचे मशीन
 • चॉपर मशीन
 • ट्रे
 • ट्रॉली
 • पॅकिंग मशीन

टीप - पुढील भागात आपण निर्जलीकरण पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत.

संपर्क - राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७
(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री, व्यवस्ठापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.)


फोटो गॅलरी

इतर कृषी प्रक्रिया
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...
‘कल्पतरू’ चिक्कीची टेस्ट एकदम बेस्ट!औरंगाबाद जिल्ह्यात भटजी (ता. खुलताबाद) येथील राणी...
जवस : एक सुपर फूडजवस  पिकाचा प्रत्येक भाग हा...
आरोग्यदायी गुलकंदगुलकंद हा गुलाब फुलाच्या पाकळ्यापासून बनविलेला...
अंबाडीपासून प्रक्रियायुक्त पदार्थअंबाडी ही भाजी म्हणून काही प्रमाणात खाल्ली जाते....
प्रक्रियायुक्त आहारासाठी भरडधान्य...भरड धान्यामध्ये एकूणच प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे...
आरोग्यदायी आले आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे...
करार शेती यशस्वी होण्यासाठी पारदर्शकता...बाजारपेठेच्या मागणीनुसार बदलण्यामध्ये आपल्या...
संतुलीत आहार स्रोत ः सीताफळसीताफळाची लोकप्रियता कोरडवाहू लागवडयोग्य, कीड...
आहार अन्‌ प्रक्रिया उद्योगासाठी...भरड धान्ये इतर धान्यांच्या तुलनेने स्वस्त असतात....
काशीफळापासून रायता, सूप, हलवाकाशीफळामध्ये जीवनसत्त्व, खनिजे आणि तंतुमय पदार्थ...
अळिंबीचे पौष्टिक, औषधी गुणधर्म अन्...लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी अळिंबी (मशरूम)...
पपईपासून बनवा मूल्यवर्धित पदार्थपपई ही आरोग्यास पोषक असून, त्यापासून जाम, जेली,...
आवळा प्रक्रिया उद्योगातील संधीआवळा फळांमध्ये असणारे औषधी गुणधर्म व भरपूर...
गुलाबापासून गुलकंद, जॅम,जेलीगुलाबाच्या पाकळ्यापासून गुलकंद, जॅम, जेली इत्यादी...
फळे, भाजीपाल्याचे पूर्व शीतकरणपूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक...
मसाल्यातील भेसळ ओळखण्याच्या पद्धती बाजारामध्ये उपलब्ध असलेल्‍या अनेक मसाल्यांमध्ये...
संत्र्याचे काढणीपश्‍चात तंत्रज्ञानसंत्रावर्गीय फळांचा आकर्षक रंग,स्वाद, चव टिकून...