ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंता

जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांशी काखान्यांचा ऊस तोडणीचा कार्यक्रम अजूनही जूनच्या पहिल्याच सप्ताहातील सुरू असल्यामुळे ऊसतोड येण्यास विलंब होत आहे.
Delay in cane harvesting; Anxiety among farmers
Delay in cane harvesting; Anxiety among farmers

सातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची विस्कळित झालेली ऊस तोडणी यंत्रणा यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारीचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांशी काखान्यांचा ऊस तोडणीचा कार्यक्रम अजूनही जूनच्या पहिल्याच सप्ताहातील सुरू असल्यामुळे ऊसतोड येण्यास विलंब होत आहे. यामुळे उसाला मोठ्या प्रमाणात तुरे येत आल्याने उसाच्या वजनात घट होणार आहे.

जिल्ह्यात यावेळी ऊस गाळप हंगाम वेळेत सुरू झाला होता. दरा संदर्भात काही प्रमाणात ऊस आंदोलन झाली मात्र काही कारखान्यांनी पूर्ण एफआरपी तर काही कारखान्यांनी ८०-२० फॉर्म्युला स्वीकारत ऊस बिले काढली आहे. कोरोनामुळे भाजीपाला विक्रीतील निर्माण झालेल्या अडचणी, आले पिकांच्या दरातील घसरण तसेच इतर पिकांचे अस्थिर दर पावसाचे वाढलेले प्रमाण यामुळे गेल्या दोन वर्षात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. माण, खटाव, खंडाळा, फलटण, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यात उसाचे क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. 

यामुळे या हंगामात गाळपासाठी मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र शिल्लक आहे. उत्पन्न वाढ व लवकर ऊस तुटावा यासाठी आडसाली ऊस घेण्याकडे कल वाढला आहे. ऊस हंगाम सुरू झाल्यावर अवेळी जोरदार पाऊस झाल्याने ऊसतोडणी यंत्रणा ठप्प झाली होती. पावसामुळे वाया गेलेले दिवस तसेच अनेक कारखान्यांची विस्कळित झालेली तोडणी यंत्रणेचा परिणाम दिसू लागला असून संथगतीने सुरू आहे. सध्या १६ पैकी १३ कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू आहे. एकूणच शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक असल्याने हंगामही लांबणार आहे.

हार्वेस्टर वापर वाढवा तोडणी यंत्रणा विस्कळित होण्याचा फटका प्रत्यक्ष शेतकऱ्यांना बसत आहे. यामुळे या तोडणी यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी सर्वच कारखान्यांनी हार्वेस्टरचा वापर वाढवणे गरजेचे झाले आहे. या वापरामुळे उसाला वेळत तोडणी होईल यामुळे शेतकऱ्यांचा नुकसान कमी होऊन दुसरे पीक किंवा आंतरपीक घेणे शक्य होईल.

ट्रॅक्टर शेतमालकाची फसवणूक  शेतीला पूरक म्हणून अनेक शेतकरी ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. ट्रॅक्टर मालकांना कारखान्यांकडून उचल दिली जाते. ही मिळालेली उचल तसेच स्वतःकडील काही असे लाखो रुपये देऊन ऊसतोड मजूर आणले जातात. मात्र, या मजुरांकडून फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अनेकवेळा ऊस टोळ्या येत नाहीत तर काही टोळ्या मधूनच निघून जातात. यामुळे ट्रॅक्टर मालकांची लाखो रुपयांची फसवणूक होत. कारखान्यांकडून घेतलेली उचल माघारी देण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना वाहने विकावी लागली आहेत. त्याचबरोबर यंत्रणा कमी झाल्याने ऊस तोडणीस विलंब होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com