हरभरा खरेदी
हरभरा खरेदी

तीन जिल्ह्यांत हरभऱ्याचे २८ कोटींचे चुकारे रखडले

नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत नाफेड आणि विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्यातर्फे ७ हजार ५८७ शेतकऱ्यांचा १ लाख १४ हजार ८३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. मंगळवारी (ता. २९) खरेदी बंद झाल्यामुळे तीन जिल्ह्यांतील नोंदणी केलेल्या २८ हजार ४१९ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे मोजमाप लटकले असून, शेतकऱ्यांचे २८ कोटी २७ लाख ८८ हजार रुपयाचे चुकारे रखडले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील नाफेडच्या आठ आणि विदर्भ मार्केटिंग को आॅपरेटिव्ह फेडरेशनच्या एका खरेदी केंद्रावर २०६९१ शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली होती. मंगळवारअखेरपर्यंत ४३८२ शेतकऱ्यांचा ६९ हजार २३८ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. अजून १६३०९ शेतकऱ्यांची मोजमाप शिल्लक आहे.

परभणी जिल्ह्यातील नाफेडच्या सात आणि विदर्भ मार्केटिंग काे-आॅपरेटिव्ह फेडरेशच्या एका केंद्रावर ८२६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५३२ शेतकऱ्यांचा ३५१५८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आली. परंतु ५७०४ शेतकऱ्यांची हरभरा खरेदी लटकली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नाफेड च्या पाच खरेदी केंद्रावर ७०५२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. प्रत्यक्षात ६७३ शेतकऱ्यांचा १०,४४३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे नांदेड जिल्ह्यात ३० हजार क्विंटल, परभणी जिल्ह्यात २४,४४७ क्विंटल, हिंगोली जिल्ह्यात ९८२३ क्विंटल हरभरा असा एकूण ६४ हजार २७० क्विंटल हरभरा खरेदी केंद्रावर पडून आहे. त्यामुळे २८ कोटी २७ लाख ८८ हजार रुपयांचे चुकारे रखडले आहेत. खरिपाची पेरणी जवळ येऊन ठेपलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चुकारे अदा करण्याचे काम युद्धपातळीवर करणे आवश्यक आहे. जिल्हानिहाय हरभरा खरेदी (क्विंटलमध्ये)

जिल्हा खरेदी शेतकरी संख्या नोंदणी केलेले शेतकरी
नांदेड ६९२३८  ४३८२  २०६९१
परभणी ३५१५८ २५३२ ८२६३
हिंगोली १०४४३ ६७३ ७०५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com