agriculture news in marathi, delay for cotton procurement, akola, maharashtra | Agrowon

दिवाळी संपूनही शासकीय कापूस खरेदीला मुहूर्त नाहीच
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापसाची काढणी जोमाने सुरू झालेली असून शासकीय खरेदी केंद्र मात्र अद्यापही सुरू झालेले नाहीत. दरवर्षी दिवाळी दरम्यान सुरू होणारे हे खरेदी केंद्र यंदा अद्यापही सुरू करण्याच्या कुठल्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचा दर ५५०० ते ६००० रुपयांदरम्यान असल्याने शेतकऱ्यांमधूनही केंद्र सुरू करण्याची फारशी मागणी होताना दिसत नाही.

अकोला : या हंगामात लागवड केलेल्या बागायती तसेच कोरडवाहू कापसाची काढणी जोमाने सुरू झालेली असून शासकीय खरेदी केंद्र मात्र अद्यापही सुरू झालेले नाहीत. दरवर्षी दिवाळी दरम्यान सुरू होणारे हे खरेदी केंद्र यंदा अद्यापही सुरू करण्याच्या कुठल्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. दुसरीकडे खुल्या बाजारात कापसाचा दर ५५०० ते ६००० रुपयांदरम्यान असल्याने शेतकऱ्यांमधूनही केंद्र सुरू करण्याची फारशी मागणी होताना दिसत नाही.

प्री-माॅन्सून लागवड झालेल्या कपाशीची वेचणी दसऱ्यापासूनच सुरू झाली होती. पहिली वेचणी झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदीचा मुहूर्त साधला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे कापसाचे दर सुरवातीपासूनच चांगले मिळत आहेत. आता दिवाळीच्या मुहूर्तावर बहुतांश व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला सुरवात केली आहे. व्यापाऱ्यांकडून कापसाला सरासरी ५५०० ते ६००० रुपयांदरम्यान दर देण्यात येत आहेत. काही ठिकाणी याहीपेक्षा चांगले दर मिळत आहे. परिणामी शासकीय खरेदीबाबत कुठेही फारसा आग्रह होताना दिसत नाही.

दरवर्षी सीसीआय कापूस खरेदी करते. या संस्थेसाठी राज्यात कापूस पणन महासंघ सबएजन्ट म्हणून काम करीत असतो. पणन महासंघाला यासाठी विशिष्ट कमिशन दिले जाते. या हंगामात सुरवातीपासूनच ‘सीसीआय’च्या खरेदीच्या निकषांमुळे खरेदीदार उत्सुकता दाखवायला तयार नव्हते. यामुळे अनेक दिवसांपासून तयार झालेला पेच सुटला नाही. दिवाळीसुद्धा लोटली. आता खरेदी सुरू केली तरी शासनाला कापूस मिळेल याची शक्यता दिसत नाही. कारण, शासनाने मध्यम धाग्यासाठी ५१५० व लांब धाग्याच्या कापसासाठी ५४५० रुपये दर जाहीर केलेला आहे.  खुल्या बाजारातील दर यापेक्षा अधिक आहेत.

गेल्याच आठवड्यात अकोटमध्ये बाजार समितीत खरेदी सुरू झाली. त्या वेळी ५८०० रुपयांवर दर देण्यात आला. अशा स्थितीमुळे शासकीय खरेदी केंद्रांना कापूस मिळणे कठीण असल्याचे दिसत आहे. हमी दरापेक्षा आताच हजार रुपयांनी अधिक दर आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच्या कापसाचा दर्जा गेल्या काही वर्षांत चांगला असल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर काही अंदाज हे कापसाचा दर सात हजारांचा टप्पा पार करू शकते असे येत असल्याने अनेकांनी कापूस साठवणूक सुरू केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...