agriculture news in marathi, delay for cotton season due to rain, yavatmal, maharashtra | Agrowon

पावसामुळे लांबला कापसाचा हंगाम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

या वर्षी सततच्या पावसामुळे तण व किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादकता खर्च देखील वाढला. दिवाळीपूर्वी अर्धा अधिक कापूस घरी यायचा पण या वर्षी असे झाले की बोंडभर कपूस देखील घरी आला नाही. भरक जमिनीवरची तीच स्थिती असून, दोन, चार बोंडे लागलेली आहेत व ती फुटली देखील, परंतु पुन्हा बोंड लागण्याची शक्‍यता नाही.
- किसन जोगी, कापूस उत्पादक शेतकरी, वडकी, जि. यवतमाळ

राळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम लांबल्याने उत्पादकतेत घट येण्यासोबतच कापूस विकून दिवाळी साजरी करणेही या वेळी शेतकऱ्यांना शक्‍य होणार नसल्याची स्थिती आहे. राळेगाव तालुक्‍यात या वर्षी सुमारे ४७ हजार ९३ हेक्‍टरवर कापसाची लागवड आहे. 
यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक कापसाखालील क्षेत्र आहे. कोरडवाहू कापूस या भागात बहुतांश शेतकरी घेतात. त्यामुळे उत्पादकतेबाबत दरवर्षीच अनिश्‍चितता राहते. गेल्या वर्षी कमी पावसामुळे उत्पादकतेत घट नोंदविण्यात आली. या वर्षी मात्र पावसाचा फटका कापूस पिकाला बसला आहे.

भारी जमिनीतील कापसाला बोंडच धरली नसल्याने हंगाम लांबण्याची भीती वर्तविली जात आहे. हलक्‍या जमिनीत कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पऱ्हाटीला बोंड धरली आणि ती फुलली देखील. परंतु या जमिनीत दुबार वेचा होण्याची शक्‍यता कमी असल्याचे निरीक्षण शेतकऱ्यांनी नोंदविले आहे. दरवर्षी दिवाळीपूर्वी कापसाचा पहिला वेचा होतो. बाजारात त्याची विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांद्वारे याच पैशाचा वापर दिवाळी सण साजरा करण्यासाठी केला जातो. त्याच पार्श्‍वभूमीवर कापूस पणन महासंघ व सीसीआयकडून देखील दिवाळीच्या काळातच खरेदी केंद्र सुरू केली जातात. या वर्षी मात्र या केंद्राबाबत अनिश्‍चितता निर्माण झाली आहे. 

संततधार पावसामुळे कापसाच्या उत्पादकतेवर निश्‍चितच परिणाम होणार आहे. दिवाळीतच कापूस घरात येतो, अशी स्थिती दरवर्षी राहते. त्याच पैशावर शेतकरी दिवाळी साजरी करतात. या वर्षी मात्र पावसामुळे हंगाम लांबला आहे, अशी माहिती राळेगावचे तालुका कृषी अधिकारी  डी. एस. प्रधान यांनी दिली.

 


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...