agriculture news in marathi, delay for grapes scrach pruning, sangli, maharashtra | Agrowon

सांगलीतील दुष्काळी भागात द्राक्षाच्या एप्रिल छाटण्या रखडल्या
टीम अॅग्रोवन
रविवार, 22 एप्रिल 2018

पाण्याची कमरता असल्याने खरड छाटणी लांबणीवर टाकली आहे. मुळात आमच्या भागात ‘आरफळ’चे पाणी येते. मात्र अद्यापही आरफळ योजनेचे पाणी आले नसल्याने एप्रिल छाटणीवर परिमाण झाला आहे. टॅंकरद्वारे पाण्याची सोय करून एप्रिल छाटणीचे नियोजन केले आहे.
- नीलेश माळी, सावळज, ता. तासगाव, जि. सांगली.

सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम संपला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी एप्रिल छाटणी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र दुष्काळी भागातील खानापूर, तासगाव, आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांत पाणीटंचाईमुळे एप्रिल छाटण्या रखडल्या आहेत.

जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे एक लाख एकर आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत द्राक्षाच्या क्षेत्रात सुमारे १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीवर मात करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतले. द्राक्ष आणि बेदाण्याला चांगले दर राहिल्याने शेतकरी समाधानी आहेत.

द्राक्ष उत्पादक शेतकरी खरड छाटणीचे नियोजन करू लागले आहेत. वाळवा, पलूस तालुक्‍यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या एप्रिल छाटण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्‍यांसह मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागात पाण्याची कमतरता भासते आहे. जरी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असल्या, तरी वेळेत पाणी मिळत नाही. याचा परिमाण एप्रिल छाटणीवर दिसतो आहे. 

गेल्या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही यंदा विहिरी, कूपनलिकांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. कमी पाणी असले तरीही उशिरात उशिरा १५ एप्रिलपर्यंत छाटण्या घेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्यायच नाही. द्राक्ष गेल्यानंतर विश्रांतीचा काळ संपला आहे. यामुळे कमी पाणी असले तरी छाटण्या घ्याव्याच लागल्या. याचा परिणाम द्राक्ष पिकावर नक्कीच होण्याची शक्‍यता आहे.

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...