agriculture news in Marathi delay in grapes season in Sangali Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगामास उशीर

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. 

सांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात. जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते. 

यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरु झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत.

काही ठिकाणी व्यापारी दाखल झाले असले, तरी द्राक्षाची गोडी नसल्याने काढणीला सुरुवात केली नाही. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे. 

प्रतिक्रिया
यंदा द्राक्षाच्या हंगामाला प्रारंभापासून फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून बागा उत्तमरीत्या जोपासल्या आहेत. एकाच वेळी छाटणी झाल्याने हंगाम उशिरा सुरू होईल. 
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ 


इतर अॅग्रो विशेष
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...
‘पीएम-किसान’मध्ये महाराष्ट्राचा डंका पुणे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत (पीएम-...
‘ई-नाम’द्वारे १०० कोटी पेमेंट झाल्याचा...पुणे ः गेल्या चार वर्षांत ‘ई-नाम’ अंतर्गत ४ हजार...