Delay in receipt of crop insurance amount in Nanded, Parbhani, Hingoli districts
Delay in receipt of crop insurance amount in Nanded, Parbhani, Hingoli districts

नांदेड, परभणी, हिंगोलीत पीकविम्यास विलंब

ग्रामीण बॅंकेच्या सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा झाली. परंतु, जिल्हा तसेच अन्य काही बॅंकांच्या सभासदांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झालेली नाही. - ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड काढणीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. परंतु, अनेक मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी विमाभरपाई मंजूर करण्यात आली. सर्व शेतकऱ्यांना पूर्ण जोखीम रकमेएवढा परतावा मंजूर करावा. - विलास बाबर, शेतकरी संघर्ष समिती, परभणी

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील एकूण ११ लाख ७७ हजार १०६ शेतकऱ्यांना सन २०१९ च्या खरिप हंगामातील सोयाबीन, अन्य पिकांच्या नुकसानीसाठी ६९४ कोटी ८७ लाख १३ हजार १९७ रुपयांचा विमा परतावा मंजूर करण्यात आला. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम जमा करण्यात आली. परंतु, पंधरा दिवसांचा कालावधी उलटला, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर परताव्याची रक्कम जमा करण्यात आलेली नाही.

नुकसान भरपाई देताना कोणते निकष लावले, त्याबाबतची माहिती विमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केलेली नाही. बहुतांश मंडळातील शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीचे प्रमाण सारखे आहे. मात्र, परताव्याच्या रकमेत मोठी तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

नांदेड जिल्ह्यातील ६ लाख ३० हजार ९५७ शेतकऱ्यांना सोयाबीन, उडीद, ज्वारी या पिकांच्या नुकसानीसाठी ३१३ कोटी ६९ लाख ५२ हजार ५३८ रुपये विमा परतावा मंजूर करण्यात आला आहे.  हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीन आणि ज्वारी या पिकांच्या नुकसानीबद्दल १ लाख ४९ हजार ३२९ शेतकऱ्यांना ११७ कोटी ६५ लाख १० हजार ४७८ रुपये मंजूर झाले. सोयाबीन पिकाच्या नुकसानीचे प्रमाण सारखेच आहे. परंतु, प्रतिहेक्टरी विमा परताव्याचा दरात मात्र मोठी तफावत आहे. 

परभणी जिल्ह्यातील चाटोरी मंडळामध्ये सर्वाधिक ३० हजार ४७९ रुपये प्रतिहेक्टर, तर झरी मंडळामध्ये सर्वात कमी ५ हजार ५२१ रुपये प्रतिहेक्टर परतावा मंजूर करण्यात आला. नांदेड, हिंगोलीत मंजूर परताव्यात तफावत आहे. पीकविमा मंजुर होऊन पंधरा दिवसांहून अधिक कालावधी उलटला आहे. खात्यावर रक्कम जमा केलेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com