सरकारमुळेच धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटण्यास विलंब : डॉ. भारत पाटणकर

सरकारमुळेच धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटण्यास विलंब : डॉ. भारत पाटणकर
सरकारमुळेच धरणग्रस्तांचे प्रश्‍न सुटण्यास विलंब : डॉ. भारत पाटणकर

पंढरपूर, जि. सोलापूर : सरकारच्या नाकर्तेपणामुळेच धरणग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यास विलंब होत आहे. सरकारचे हेच धोरण राहिल्यास येत्या निवडणुकांत सर्वसामान्यांना आपले प्रश्‍न सोडवण्यासाठी सरकार बदलण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मत डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केले. 

येथील तहसील कचेरीसमोर धरणग्रस्तांच्या विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. डॉ. पाटणकर यांनी येथे येऊन धरणग्रस्तांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, रणजित जगताप आणि धरणग्रस्त आंदोलक उपस्थित होते.

डॉ. पाटणकर यांनी २०१५ ला सरकारने धरणग्रस्तांच्या संदर्भात घोषित केलेल्या अनेक निर्णयांची अजून अंमलबजावणी झालेली नसल्याने खंत व्यक्त केली. 

डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘ज्यांच्या जमिनी धरण आणि प्रकल्पांसाठी गेल्या अशा लोकांचा समन्यायी पद्धतीने विकास झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. परंतु, सध्याचे सरकार हे टाटा, अंबानी, अदानी अशा मोठमोठ्या उद्योगपतीच्या विकासासाठी धडपडत आहे. ही बाब निंदनीय आहे. ‘उद्योगपतींचा विकास बाकी सारे भकास‘ अशी स्थिती आहे.‘‘

‘‘धरणे, व्याघ्रप्रकल्प, वीज प्रकल्प आणि अन्य लोककेंद्रित प्रकल्पांसाठी शेकडो हेक्‍टर जमिनी घेण्यात आल्या. अशा शेतकऱ्यांची संख्या राज्यात १५ लाखांहून अधिक आहे. त्यापैकी केवळ १० टक्के म्हणजे दीड लाख शेतकऱ्यांना जमिनीची नुकसानभरपाई, अन्य ठिकाणी जमिनी, नोकरीत समावेश व अन्य सुविधा मिळाल्या. मात्र, सुमारे साडेतेरा लाखांहून अधिक प्रकल्पग्रस्त, सुविधांपासून वंचित आहेत. या लोकांना न्याय मिळेपर्यंत, आमचा लढा सुरूच, असे डॉ. पाटणकर यांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com