दुष्काळी अनुदान जमा करण्यास दिरंगाई; बँक व्यवस्थापकास नोटीस

दुष्काळी अनुदान जमा करण्यास दिरंगाई; बँक व्यवस्थापकास नोटीस
दुष्काळी अनुदान जमा करण्यास दिरंगाई; बँक व्यवस्थापकास नोटीस

पैठण, जि. औरंगाबाद : शासनाने मंजूर केलेले सहा कोटी ५७ लाख ५५ हजार सहाशे रुपयांचे दुष्काळी अनुदान वाटप न केल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी शासनाच्या निधीचा अपहार केल्याची नोटीस स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकास दिली आहे. दरम्यान, अनुदानाचा निधी बॅंकेच्या हलगर्जीपणामुळे मिळाला नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्‍यातील १४५ गावांतील पंधरा हजार ४३ पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. बॅंकेच्या व्यवस्थापकाविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

खरीप हंगाम २०१८-१९ या वर्षात दुष्काळाने बाधित झालेल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने अनुदान मंजूर केले. अनुदानाचा निधी वाटप करण्यासाठी तहसीलच्या महसूल विभागाच्या यंत्रणेने अहोरात्र पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली. त्यासाठी लागणारा निधी बॅंकेत जमा केला; परंतु बॅंक व्यवस्थापकाने मात्र टाळाटाळ केल्यामुळे निधी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. याबाबत काही शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याची तक्रार तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे केली. त्यांनी बॅंकेकडे केलेल्या चौकशीत अनुदान वाटप झाले नसल्याची बाब उघडकीस आली. यानंतर हे अनुदान वाटप करण्याबाबत श्री. सावंत यांनी बॅंकेचे व्यवस्थापक यांच्याशी तीनवेळा लेखी पत्रव्यवहार करूनही बॅंकेने टाळाटाळ सुरू ठेवली. 

या मनमानी कारभाराविरुद्ध व्यवस्थापकास नोटीस बजाविली. त्यात शेतकरी खातेदाराच्या खात्यावर अनुदानाची रक्कम वर्ग न करणे ही गंभीर बाब असल्याचे स्पष्ट करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी दोषी धरून आपणाविरुद्ध नैसर्गिक आपत्ती अधिनियम २००६ अन्वये कार्यवाही करण्याचा इशारा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com