Agriculture news in marathi Delete the ban on onion export & give Guarantee on prices | Agrowon

'कांद्याची निर्यातबंदी हटवून हमीभाव द्या'

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अमरावती  ः निर्यातबंदी हटवून कांद्याला प्रति क्‍विंटल १००० ते १५०० रुपयांचा दर देण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली. 

अमरावती  ः निर्यातबंदी हटवून कांद्याला प्रति क्‍विंटल १००० ते १५०० रुपयांचा दर देण्यात यावा, अशी मागणी स्वराज्य बहूउद्देशीय संस्थेच्या वतीने कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे करण्यात आली. 

कांद्याचा हंगाम सुरू झाला की भाव पाडले जातात. शेतकऱ्यांकडील कांदा संपला की मात्र भावात तेजी येते, असाच प्रकार दरवर्षीच्या हंगामात घडतो. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही, उलट त्यांना नुकसान सोसावे लागते. मात्र व्यापारी फारशी मेहनत न करता केवळ कृत्रिम टंचाईच्या बळावर मोठा नफा कमावून मोकळे होतात. हे चित्र बदलावे याकरिता शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याची सोय करावी, अशी मागणी संस्थेने दादा भुसे यांच्याकडे केली. गेल्या सरकारच्या काळात कांद्याचा समावेश जीवनावश्यक वस्तूच्या यादीत करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर निर्यातबंदी लादण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असून, कांद्याला प्रति क्‍विंटल हजार ते १५०० रुपयांचा दर द्यावा, निर्यातबंदी उठविण्यात यावी, कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढून टाकावे, अशा मागण्यांचे निवेदन कृषिमंत्र्यांना देण्यात आले. 

सध्याच्या सरकारला शेतकरी चिंतामुक्‍त करावयाचा असल्यास त्याच्याप्रती सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक असावा. त्याकरिता त्याला आर्थिक पाठबळ देण्यात यावे. येणाऱ्या उन्हाळी अधिवेशनात स्वामिनाथन आयोग लागू करा, कृषिपंपाचे देयक माफ करावे, शेतीला मार्च महिन्यापर्यंत तरी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, नादुरुस्त रोहित्रांची दुरुस्ती करावी, अचलपूर तसेच मोर्शी विधानसभा क्षेत्रामध्ये संत्रा आणि कापूस प्रक्रिया उद्योगाची उभारणी शासनस्तरावरून व्हावी, शेतीमालाचा बाजार दर ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना मिळावा या मागण्यांचाही निवेदनात समावेश होता. संस्थेचे अध्यक्ष सूरज देवहाते, उपाध्यक्ष शशिकांत निचत, कोशाध्यक्ष वैभव उमक या वेळी उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...