agriculture news in marathi delhi is the center of political affairs mumbai maharashtra | Agrowon

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र तूर्तास दिल्ली

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर दोन्ही काँग्रेसचे एकमत असले, तरी ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार हे शेवटच्या क्षणी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र तूर्तास दिल्ली हेच आहे.

मुंबई  : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यावर दोन्ही काँग्रेसचे एकमत असले, तरी ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार हे शेवटच्या क्षणी नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचे केंद्र तूर्तास दिल्ली हेच आहे.

भाजपने संख्याबळाअभावी सरकार स्थापन करण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग आला. ११ नोव्हेंबरला शिवसेनेने राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र, त्यावेळी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नाही. त्यामुळे १२ नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चेचा घोळ सुरू आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी मुंबईत येऊन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

चर्चेअंती किमान समान कार्यक्रमाच्या मुद्यावर राज्यातील तीनही पक्षांचे नेते एकत्र आले. सत्तावाटपाच्या सूत्राविषयी चर्चा झाल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत बैठका सुरू झाल्या. काँग्रेसने सुरुवातीपासून तीनही पक्षांत मंत्रिपदे तसेच इतर सत्तापदांची समान विभागणी व्हावी, असा आग्रह धरला आहे. याशिवाय विधानसभा अध्यक्षपदाची मागणी काँग्रेसने केलीय.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रत्येक पक्षाला १४ मंत्रिपदे मिळावीत; तसेच महत्त्वाच्या खात्यांची समान विभागणी व्हावी, अशी मागणी केल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.

शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. काँग्रेसने बाहेरून पाठिंबा दिला, तर सरकार स्थिर राहणार नाही. स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीकडून काँग्रेस नेत्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीतील काँग्रेसच्या काही नेत्यांमध्ये सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा मतप्रवाह आहे. परिणामी पक्षाचा निर्णय लांबणीवर पडत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
खानदेशात बाजरीचे क्षेत्र वाढणारजळगाव ः खानदेशात बाजरीचे क्षेत्र यंदा सुमारे...
बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी...बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण...
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन...नाशिक  : शेतकऱ्याला तातडीची मदत मिळावी,...
शरद पवार हेदेखील पंतप्रधान होऊ शकतात :...नाशिक : केंद्राने सूडबुद्धीने शरद पवार यांना...
रत्नागिरी जिल्हा परिषदेत रिक्तपदांमुळे...रत्नागिरी : मंजूर पदांपेक्षा रिक्त पदांची संख्या...
मराठवाड्यात ज्वारीवर चिकटा, मावा;...औरंगाबाद :  औरंगाबाद, जालना व बीड या...
शिवभोजन थाळी योजनेचे पुण्यात उद्‌घाटन पुणे : शासनाच्या अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध...नगर  ः  शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे  ः पुणे बाजार समितीच्या शनिवार (ता. २५...
सातारा जिल्ह्यातील प्रलंबित सिंचन...सातारा  : प्रलंबित असलेले जिल्ह्यातील सिंचन...
बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांना ...नाशिक  : कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या...
पीकविमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी...मुंबई : अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना...
पुण्यात कृषी आयटीआय संस्था सुरू करणार...पुणे : कृषी, सहकार, उद्योग विभागाला चालना...
मराठवाड्यातील पाणीप्रश्नाबाबत...औरंगाबाद  : कुणावर आक्षेप घेण्यासाठी नव्हे;...
पद्मश्री जाहीर होताच हिवरेबाजारमध्ये...नगर ः आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे...
हिवाळी हंगामात पौष्टिक चाऱ्यासाठी करा...बरसीम (शास्त्रीय नावः ट्रायफोलियम...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुणे जिल्हा परिषदेचा ‘एक पुस्तक' पॅटर्न...पुणे : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी...