agriculture news in Marathi, Delhi Govt will procure Onion in Nashik District, Maharashtra | Agrowon

दिल्ली सरकार करणार नाशिक जिल्ह्यात कांदा खरेदी
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 सप्टेंबर 2019

नाशिक : दिल्लीमध्ये ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केजरीवाल सरकारकडून किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रावर कांदा उपलब्ध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते अभिजित गोसावी यांनी दिली.
 
नाशिक जिल्ह्यातून कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणेबरोबर समन्वय साधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विशेष बाब म्हणजे दोन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

नाशिक : दिल्लीमध्ये ग्राहकांना रास्त दरात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी केजरीवाल सरकारकडून किरकोळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहेत. या केंद्रावर कांदा उपलब्ध करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते अभिजित गोसावी यांनी दिली.
 
नाशिक जिल्ह्यातून कांदा खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या यंत्रणेबरोबर समन्वय साधण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत विशेष बाब म्हणजे दोन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ नाशिकला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. 

हे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यात कांद्याची उपलब्धता, गुणवत्ता व खरेदीबाबत दौरा करणार आहे. दिल्ली सरकार ४०० रेशन दुकाने आणि मोबाईल व्हॅनद्वारे दिल्लीमध्ये नागरिकांना २३.९ रुपये प्रतिकिलो दराने कांदा उपलब्ध करून देत आहे. कांदाप्रश्‍नी शेतकरी उत्पादक व सामान्य ग्राहक या दोघांचेही हित कसे साधावे हे महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून शिकण्याची गरज आहे. जर हे दिल्लीत होऊ शकते, तर मग आपल्या महाराष्ट्रात का नाही, असा सवाल अभिजित गोसावी यांनी उपस्थित केला आहे. 

‘‘दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या या निर्णयामुळे नाशिकच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही फायदाच होणार आहे; तर दुसरीकडे अनुदान स्वरूपात होणाऱ्या कांदा विक्रीमुळे सामान्य ग्राहकालाही कांदादिलासा मिळत आहे. सरकारची नियत चांगली असली, की उत्पादक शेतकरी व सामान्य ग्राहक यांच्यात योग्य समन्वय साधून दोघांचेही हित साधता येते. हेच या निर्णयावरून दिसून येत आहे,’’ अशी प्रतिक्रिया आपचे विशाल वडघुले यांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
पर्यायाविना निर्णय घातकच! ऑ नलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) अधिक...
नैसर्गिक आपत्तीपासूनचा धडा काही वेदनांमधून सुखद आनंदप्राप्ती होते, तर काही...
किमान तापमानात किंचित वाढपुणे  : राज्यात थंडीची चाहूल लागल्यानंतर...
बाजार समित्यांना सक्षम पर्याय द्याः...पुणे ः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी...
पावसाने संत्र्यात ४० टक्के फळगळ; ४००...नागपूर : राज्याचे मुख्य फळपिकांत महत्त्वाचे स्थान...
हमीभावाने कापूस खरेदी २० नोव्हेंबरपासून...जळगाव : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) व...
बारा लाख टन साखर निर्यातीचा मार्ग मोकळापुणे : केंद्र शासनाने मुदतवाढ दिल्यामुळे देशातील...
विमा कंपन्यांचे आस्ते कदम; पंचनाम्याकडे...पुणे : राज्यातील लाखो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त...
अकोला, बुलडाण्याला खरिपात ७२५ कोटींचा...अकाेला ः गेल्या महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व...
पावसाचा मराठवाड्यात ४१ लाख हेक्‍टर...औरंगाबाद : मराठवाड्यात मॉन्सूनोत्तर पावसाने...
ग्रामपरिवर्तनाची दिशा दाखविणारे शेंदोळा...जन्म, मृत्यू, विवाहनोंदणी प्रमाणपत्र हवे असेल; तर...
रत्नागिरी : गतवर्षीच्या तुलनेत भात...रत्नागिरी ः अतिवृष्टीमुळे कोकणातील शेतकरी चांगलाच...
दक्षिण आफ्रिकेतील 'मालावी हापूस'...पुणे  ः दक्षिण आफ्रिकेतील मालावी प्रांतात...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागांना आता...सांगली ः गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी...
राज्यात रब्बीसाठी सव्वासहा हजार शेतीशाळापुणे : रब्बी हंगामात राज्यात सव्वासहा...
केंद्र सरकारकडून एक लाख टन कांदा...पुणे: मॉन्सूनचा वाढलेला मुक्काम, अतिवृष्टी,...
बाजार समित्या बरखास्त करणार : केंद्रीय...नवी दिल्ली : बाजार समित्यांची कार्यपद्धती आणि...
राज्य झाले टॅंकरमुक्त; केवळ बुलडाण्यात...पुणे: मॉन्सून आणि मॉन्सूनोत्तर काळात राज्यात...
केसर आंब्याचे उत्पादन ४५ टक्के घटणार;...औरंगाबाद : गंध आणि चवीसाठी केसर आंब्याची आपली...
किमान तापमानात चढ-उतारपुणे: मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप दिल्यानंतर...