agriculture news in marathi, Delhi Police permits Tractor parade of farmers on 26th January | Agrowon

दिल्लीतील ट्रॅक्‍टर परेडला हिरवा कंदील; महाष्ट्राचाही देखावा

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 24 जानेवारी 2021

शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी (ता.२६, मंगळवारी) राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्‍टर परेड काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अखेर परवानगी दिली.

नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनी (ता.२६, मंगळवारी) राजधानीतील बाह्य वळण रस्त्यावर ट्रॅक्‍टर परेड काढण्यासाठी दिल्ली पोलिसांनी अखेर शनिवारी (ता.२४) संध्याकाळी परवानगी दिल्याची माहिती शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी दिली. 

दरम्यान, या वेळी कोणतीही अप्रिय घटना होणार नाही व परेडनंतर लगेचच आंदोलक शेतकरी पुन्हा सीमांवर परततील याबाबत शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून दिल्ली पोलिसांनी रीतसर हमी मागितल्याचेही समजते. ही ‘परेड ऐतिहासिक असेल व सारे जग ती पाहिल’ असेही पाल यांनी सांगितले. दिल्लीतील वेगवेगळ्या ५ रस्त्यांवर शांततापूर्ण मार्गांनी निघणाऱ्या या परेडत किमान सुमारे ७ हजार ते ८ हजार ट्रॅक्‍टर सहभागी होतील असे शेतकरी नेत्यांनी सांगितले.

कृषी कायद्यांबाबत आंदोलनकर्त्या ४१ संघटनांचे नेते व शेतकरी यांच्यात शुक्रवारी झालेली १२ व्या फेरीची चर्चाही निष्फळ ठरली. मात्र कालच्या चर्चेत सरकारचा सूर काहीसा तप्त झाल्याचे दिसले. कायदे रद्द करा या मागणीवर शेतकरी नेते ठाम असून तसे करण्यास सरकारची तयारी नाही. शेतकऱ्यांना पाहिजे ते बदल कायद्यांत सुचविण्याचा पर्याय सरकार देत आहे. यामुळे आंदोलनाबाबतची कोंडी फुटलेली नाही.

आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नसतानाच शेतकरी नेत्यांनी हजारो ट्रॅक्‍टरची परेड दिल्लीतील रस्त्यांवर काढण्याचा इरादा पक्का केल्याने दिल्ली पोलिसांवरील ताण वाढला होता. पोलिस अधिकारी व शेतकरी नेते यांच्यात याबाबत ३ बैठका झाल्या. त्यात पोलिसांनी दिलेला पर्यायी मार्गांचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला होता. अखेर शनिवारी झालेल्या चर्चेअंती दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टर परेडला परवानगी दिल्याचे पाल यांनी सायंकाळी साडेसातच्या सुमारास जाहीर केले. ही परेड शांततापूर्ण मार्गाने काढण्याबाबत दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाली आहे असे योगेंद्र यादव यांनी सांगितले. 

पाल म्हणाले की पोलिस आम्हाला अडवणार नाहीत. ही ट्रॅक्‍टर परेड २६ जानेवारीला वेगवेगळ्या ५ सीमांच्या लगतच्या रस्त्यांवर सुमारे १०० किलोमीटरच्या अंतरावरून जाईल. यासाठी जितका वेळ लागेल तेवढा पोलिसांनी आम्हाला दिला आहे. या परेडसाठी पंजाबातील हजारो शेतकरी ट्रॅक्‍टरसह दिल्लीकडे आज व उद्या रवाना होतील असे भारतीय किसान संघटनेचे महासचिव सुखदेवसिंग कोकरीकला यांनी सांगितले. हरियाणातही करनाल, अंबाला, रोहतक, भिवानी, गुडगाव, कुरुक्षेत्र आदी भागांतून शेतकरी निघाले आहेत.

महाष्ट्राचाही देखावा असणार
प्रस्तावित ट्रॅक्‍टर परेडचा सविस्तर कार्यक्रम आज (ता.२४) जाहीर करण्यात येणार आहे. राष्ट्रीय किसान महासंघ व संयुक्त संघर्ष मोर्चाचे हजारो शेतकरी यात सहभागी होणार आहेत. संघर्ष मोर्चाच्या वतीने आपला एक चित्ररथही सज्ज केला असून त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील महाराष्ट्रातील कृषीसंस्कृती हा देखावा उभारण्यात येणार आहे असे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
विक्रमी उत्पादनाचे करा योग्य नियोजनवर्ष २०२०-२१ च्या हंगामात देशात अन्नधान्याचे...
दावा अन् वास्तवशेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या...
थंडीचा प्रभाव घटण्यास प्रारंभ पुणे ः अरबी समुद्राच्या परिसरात चक्रीय स्थिती...
केंद्र सरकारकडून ‘पीजीआर’ला मान्यता पुणे : शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या जैव उत्तेजकांना...
बत्तीसशे चौरस फुटांपर्यंतच्या ...मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२००...
स्वच्छता, पायाभूत सुविधांमध्ये...पिण्याचे पाणी, वीज, रस्ते यांसारख्या पायाभूत...
एकत्र या अन् ठरवा भावसातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला कोबीला...
अद्ययावत ‘मंडी’चे स्वप्न!दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस...
राज्यात ७ कोटी ९७ लाख क्विंटल साखरेचे...नगर ः राज्यात यंदाही उसाचे जोरदार गाळप सुरू आहे....
‘लम्पी स्कीन’मुळे दूध उत्पादनाला...नगर ः ‘लम्पी स्कीन’ आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या...
राज्यात चार नवे कृषी संशोधन प्रकल्पपुणे : राज्यातील कृषी शिक्षण व संशोधनाला चालना...
वंचित शेतकऱ्यांसाठी राज्यांनी पुढाकार...पुणे : ‘‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील...
राज्यात थंडीत किंचित वाढपुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र...
रत्नागिरी हापूस पोहोचला लंडनलारत्नागिरी ः लंडनस्थित भोसले एंटरप्रायझेस यूके आणि...
रब्बी ज्वारीचा हुरडा वाण विकसितपरभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
डोंगरगावात फळपीक केंद्रित प्रयोगशील...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथील...
आगाप नियोजनातून आंब्याला उच्चांकी दरकोकणातील काही आंबा बागायतदार आगाप (हंगामपूर्व)...
५० वर्षांच्या वृक्षाचे पर्यावरणीय मूल्य...साधारणतः आपण कुठल्याही वस्तूचे मूल्यमापन विविध...
कोकणात ढगाळ वातावरण पुणे ः अरबी समुद्राच्या आग्नेय भागात चक्रिय...
उन्हाळ कांद्याची बाजारात ‘एन्ट्री’ नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामातील आगाप उन्हाळ...