शेतकऱ्यांना खते, बियाणे बांधावर पोचवा ः पालकमंत्री भरणे

सोलापूर: खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोच करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.
Deliver fertilizers and seeds to farmers in farm : Guardian Minister Bharne
Deliver fertilizers and seeds to farmers in farm : Guardian Minister Bharne

सोलापूर : खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर पोच करण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागाला दिल्या.  

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे झालेल्या या बैठकीस खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्ह्यातील आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, संजय शिंदे आदी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे सहभागी झाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, महावितरण अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, उपसंचालक रवींद्र माने, नाबार्डचे प्रदिप झिले, जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते. 

बिराजदार यांनी खरीप हंगामाचे नियोजन थोडक्यात स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने खते आणि बियाण्यांचा पुरवठा वेळेत व्हावा, वीजजोडण्या लवकर मिळाव्या, शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, वीज पुरवठा थ्री फेज दाबाने व्हावा, सरकारी आणि खासगी बँकांनी पीक कर्ज पतपुरवठाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा मागण्या केल्या. त्यावर सकारात्मक रितीने निर्णय घेण्याची कार्यवाही सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना भरणे यांनी दिल्या. त्याचबरोबर काही मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  पालकमंत्र्यांच्या सूचना  शेतकऱ्यांना खतांच्या किमती कळाव्यात, यासाठी त्याची प्रसिध्दी करा, बी-बियाणे वेळेत मिळेल, याची काळजी घ्या, खते, बियाणे पोचवण्यासाठी शेतकरी गटांची मदत घ्या.  लोकप्रतिनिधींच्या सूचना 

पीककर्ज वाटप करण्याबाबत बँकांना सूचना कराव्यात, थकित कर्जाचे पुर्नगठण करावे, दुधदराबाबत विचार व्हावा, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेचे प्रस्ताव निकाली काढावे, मागेल त्याला शेततळे प्रस्ताव मंजूर करा, ठिबकचे अनुदान मिळावे, अवकाळी पावसाची मदत लवकर मिळावी, कृषी सोलर पंपाचा पुरवठा करावा.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com