Agriculture news in marathi; Deliver oranges to the global market Citrus Estate will work: Bonde | Agrowon

संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे 'सीट्रस इस्टेट' कार्य करेल ः डाॅ. बोंडे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी  'सीट्रस इस्टेट' कार्य करेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री व पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज उमरखेड येथे केले. 

अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या संत्र्याला जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी  'सीट्रस इस्टेट' कार्य करेल, असे प्रतिपादन कृषिमंत्री व पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज उमरखेड येथे केले. 

कृषी विभागातर्फे मोर्शी तालुक्यातील उमरखेड येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिकेत 'सीट्रस इस्टेट'चे उद्घाटन करताना ते बोलत होते. मोर्शीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल डबरासे, पंचायत समिती सदस्य मायाताई वानखडे, उमरखेडचे सरपंच विजय चेर, जैन इरिगेशनचे धारीवाड या वेळी उपस्थित होते. कृषी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले की, काटोल, मोर्शी व आष्टी येथे प्रत्येकी १० कोटी रुपये 'सीट्रस इस्टेट'साठी देण्यात आले आहेत. लागवडीपासून संत्रा प्रक्रियेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर ही संस्था काम करेल.  

पंजाबमध्ये 'सीट्रस इस्टेट'च्या माध्यमातून तिथे उत्पादित संत्रा निर्यात, विक्रीसाठी लाभ झाला. त्या धर्तीवर नागपुरी संत्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात उत्पादित संत्र्याची विपणन साखळी, उत्पादनाबाबत समस्यांचे निराकरण यासाठी 'सीट्रस इस्टेट' कार्य करेल. 'सीट्रस इस्टेट'ची संकल्पना सर्वप्रथम पंजाबमध्ये राबवली गेली. कृषी मंत्री डॉ. बोंडे यांच्या प्रयत्नामुळे ही संकल्पना जिल्ह्यातही साकार होत आहे. ही शासनस्थापित संत्राउत्पादक शेतकऱ्यांची सहकारी संस्था असून, जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासह समस्यांचे निराकरण करेल, असे श्री. नागरे म्हणाले. 


इतर बातम्या
पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा...मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा...
बुलडाण्यात जिल्हाधिकारी चंद्रा यांनी...बुलडाणा  ः कृषी विभागामार्फत जिल्ह्यात...
‘पीएम-किसान’चा १२ कोटी शेतकऱ्यांना...नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी...
नैसर्गिक रंग बनविण्याचे महिलांनी...अकोला  ः पुढील महिन्यात रंगपंचमीचा उत्सव जवळ...
आंबा, काजू क्लस्टरसाठी रत्नागिरी,...रत्नागिरी : विविध देशांमधील आंबा, काजूची निर्यात...
बदलत्या हवामानाचा गव्हाला फटकाअमळनेर, जि. जळगाव  : तालुक्‍यात गहू पिकाची...
भंडारा जिल्ह्यात धान विक्रीचे १११...भंडारा  ः शासनाने हमीभावात बोनसच्या...
पंजाबमध्ये भूमिहीन शेतमजुरांना कर्जमाफीचंदीगड, पंजाब: राज्याचा २०२०-२१ चा १.५४ लाख...
देशात ११० लाख टन हरभरा उत्पादनाचा अंदाजनवी दिल्ली: देशात यंदा हरभरा उत्पादनात वाढ...
‘पोकरा’तील सामुदायिक शेततळे, शेळीपालन...अकोला ः राज्यात राबविल्या जात असलेल्या नानाजी...
लाल कंधारी, देवणी गोवंश संवर्धनासाठी...परभणी  ः मराठवाडा विभागातील लाल कंधारी आणि...
गोंदिया जिल्ह्यात भरडाईच्या...गोंदिया  ः भरडाईसाठी धानाची उचल होण्याची गती...
आटपाडी तालुक्यात बंद साखर कारखान्यांचा...खरसुंडी, जि. सांगली : टेंभू योजनेच्या खात्रीशीर...
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
सेवा हमी कायदा नागरिकांपर्यंत पोचवून...नाशिक  : सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार...
चांदवड येथे साडी नेसून आंदोलननाशिक : चांदवड खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून...
ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावीमुंबई  ः ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी ही...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
नांदेड जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची...नांदेड : यंदा उन्हाळी हंगामात जिल्ह्यात गुरुवार (...
केंद्राच्या योजनांची अंमलबजावणी करा :...हिंगोली : ‘‘केंद्र शासन पुरस्कृत योजनांचा लाभ...