Agriculture News in Marathi Demand for 33,500 quintals of seeds for rabbi | Page 2 ||| Agrowon

पुणे : रब्बीसाठी ३३,५०० क्विंटल बियाणांची मागणी 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 25 ऑक्टोबर 2021

पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३३ हजार ५०० क्विटंल बियाणांची मागणी केली आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३३ हजार ५०० क्विटंल बियाणांची मागणी केली आहे. कृषी आयुक्तलयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाणांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

यंदा पुरेसा पाऊस झाल्याने जमिनीत ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रब्बी हंगामात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढणार असल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ३५ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हंगामात कृषी विभागाने २ लाख ५६ हजार ७७० हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र रब्बी ज्वारीचे आहे. सुमारे १ लाख ४७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी बियाणाची मागणी मोठी आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे. 

गेल्या तीन वर्षांत रब्बी हंगामात सरासरी २४ हजार ५८८ क्विटंल बियाणांची विक्री झाली होती. त्याच धर्तीवर चालू वर्षीही कृषी विभागाने बियाणांचे नियोजन केले आहे. यंदा महाबीजमार्फत सुमारे १० हजार क्विटल बियाणांचा पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खासगी कंपन्याकडून २३ हजार ५०० क्विंटल, उर्वरित बियाणांचा पुरवठा राष्ट्रीय बीज निगमकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामात बियाणांची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

रब्बी हंगामासाठी बियाणांची केलेली मागणी (क्विंटलमध्ये) 
पीक --- बियाणे (क्विंटलमध्ये) 
ज्वारी --- ३६८७ 
गहू --- २०,२५८ 
हरभरा --- ५६६५ 
सुर्यफूल -- ८ 
करडई --- २ 
मका --- १४६३ 
इतर तृणधान्य -- १२४ 
इतर कडधान्य -- ४९१ 
तीळ -- १ 
इतर तेलबिया -- ९४१ 
भाजीपाला -- ८६२ 
एकूण -- ३३,५०० 


इतर बातम्या
नवीन ११४० कृषिपंपांना जोडण्या ः पडळकरनांदेड : ‘‘राज्य शासनाने सुरू केलेल्या कृषिपंप...
नाशिक: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत...नाशिक: खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये केंद्र...
सांगली जिल्ह्यात बाधित पिकांचे पंचनामे...सांगली ः जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी...
जळगाव : नावासह पत्ता दुरुस्तीसाठी  ६५...जळगाव : जिल्ह्यात मतदार यादी विशेष संक्षिप्त...
खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडत जळगाव ः खानदेशात रब्बी पिकांची पेरणी रखडतच सुरू...
नाशिक : दुधाळ जनावरांच्या गटवाटप ...नाशिक : पशुसंवर्धन विभागामार्फत नावीन्यपूर्ण...
सोलापूर :सिद्धेश्‍वर कारखान्याला...सोलापूर ः कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...
औरंगाबाद : जमिनीवरील अत्याचार थांबवू;...औरंगाबाद : आम्ही आमच्या गावातील जमिनीवर होणारे...
प्रोग्रेसिव्ह पॅनेलला  काठावरचे बहुमत पुणे ः पुणे बाजार समितीमधील भुसार व्यापाऱ्यांची...
उत्पादन खर्च वाढल्याने येवल्याची पैठणी...येवला, जि. नाशिक : राजवस्त्र, अर्थात येवल्याची...
रेशीम कोषाला सोनेरी दिवसपुणे : चालू वर्षी रेशीम कोषाला सोन्याचे दिवस आले...
पुणे :एकवीस जागांसाठी २९९ अर्जपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...