मोसमपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

मोसमपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
मोसमपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

नाशिक  : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे मोसम नदीपात्रातील वाळूउपसा मोठ्या प्रमाणात सर्रासपणे होत आहे. वाळूउपशाच्या परिसरात गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या व इतर शेतकऱ्यांच्या विहिरी आहेत. मोसम नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात उपसा होत असून, अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  चालू वर्षी वाळूउपसा झालेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीने तळ गाठला आहे. या वाळूउपशामुळे गावाच्या पिण्याचा प्रश्न व शेती व्यवसाय यामुळे पूर्णपणे धोक्यात आला आहे. संबंधित अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत विभागाकडे वारंवार तक्रारी करून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. उलट पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.  वाळूमाफियांकडून प्रशासन सहभागी आहे की काय? त्यामुळे तक्रारीचे निवारण होत नाही, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. भविष्यात पाण्यावरचे संकट टिकवण्यासाठी वाळूचोरी व उपसा करण्यावर कारवाई करावी; अन्यथा तलाठी कार्यालय समोर उपोषणास बसण्यात येइल, असा लेखी इशारा येथील कुणाल नंदन यांनी दिला आहे. नंदन यांनी महसूल विभागाकडे अर्ज दाखल केल्यानंतर स्थानिक ट्रॅक्टर व गाढवमालक वाळूमाफियांकडून जिवे मारण्याची धमक्या येत असल्याचे तक्रारदाराकडून सांगण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com