तंत्रज्ञानाव्दारे शेतमाल मागणी, पुरवठ्याचे संतुलन शक्‍य ः कुलगुरू भाले

तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पीक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधणे शक्य होऊन शेतकऱ्यांना योग्‍य मोबदला मिळू शकेल. शेतमालाची नासाडी कमी करण्‍याकरिता प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.
Demand for agricultural commodities through technology, balance of supply possible: VC spear
Demand for agricultural commodities through technology, balance of supply possible: VC spear

परभणी ः देशात मुबलक प्रमाणात अन्नधान्‍यांचे उत्‍पादन होत आहे. अतिरिक्‍त शेतमालास बाजारभाव मिळत नाही. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विविध पीक लागवडीचे नियोजन केल्‍यास शेतमाल मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन साधणे शक्य होऊन शेतकऱ्यांना योग्‍य मोबदला मिळू शकेल. शेतमालाची नासाडी कमी करण्‍याकरिता प्रयत्‍न करावे लागतील, असे प्रतिपादन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंटर ऑफ एक्‍सलंस, राष्‍ट्रीय कृषी उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) आणि आयएसए व आयएसजीपीबी परभणी शाखेतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाव्‍दारे स्‍मार्ट शेती ः भविष्‍यात्‍मक योजना यावर ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप कार्यक्रमात गुरुवारी (ता. १३) ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. अशोक ढवण अध्यक्षस्थानी होते. छत्‍तीसगड मधील रायपूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. के. घोष, नवी दिल्‍ली येथील आयसीएआरचे डॉ. एस. भास्‍कर, भारतीय कृषीविद्या संस्‍थेचे उपाध्‍यक्ष डॉ. यू. व्‍ही. महाडकर, इस्राईल तंत्रज्ञान संस्‍थेचे डॉ. राफेल लिंकर, नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय समन्‍वयक डॉ. प्रभात कुमार, शिक्षण संचालक डॉ. डी. एन. गोखले, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. डी. बी. देवसरकर, नाहेप प्रकल्‍पाचे मुख्‍य संशोधक डॉ. गोपाल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. भाले पुढे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम होत आहे. यावर्षी सोयाबीनच्‍या कमी उगवण क्षमतेमुळे नुकसान झाले. झालेल्‍या नुकसानीबाबत शासनाने सर्वेक्षण केले. यात अनेक अडचणी येतात. शेतकऱ्यांचे नुकसान पूर्णपणे भरून शक्‍य नाही.

डॉ. ढवण म्‍हणाले की, वाढत्‍या लोकसंख्‍येला पोषक आहार,  शेतकऱ्यांना योग्‍य मोबदला, दर्जेदार अन्न निर्मिती, सार्वजनिक वितरण प्रणाली, प्रक्रिया व पॅकेजिंग सुविधांचे बळकटीकरण आदींकरिता डिजिटल तंत्रज्ञानाचा भविष्‍यात मोठा वापर होईल.

डॉ. घोष म्‍हणाले की, डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीत वापर वाढण्‍याकरिता लागणाऱ्या मनुष्‍यबळ निर्मितीची मोठी जबाबदारी सेंटर ऑफ एक्‍सलंस म्‍हणजेच नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठास दिली आहे. प्रास्‍ताविक डॉ. देवसरकर यांनी केले.

सूत्रसंचालन डॉ. आय. ए. बी. मिर्झा, डॉ. सुनिता पवार यांनी केले. तर डॉ. गोखले यांनी आभार मानले. डॉ. ए. के. गोरे यांनी सदरील आंतरराष्‍ट्रीय  परिषदेचा अहवाल मांडला. डॉ. जे. ई. जहागीरदार, डॉ. भगवान आसेवार, डॉ. एच. व्‍ही. काळपांडे, डॉ. आर. व्‍ही .चव्‍हाण, डॉ. आय. ए .बी. मिर्झा, डॉ. एस. व्‍ही. कल्‍याणकर, डॉ. जे. डी. देशमुख, डॉ. पी. के. वाघमारे, खेमचंद कापगाते, डॉ. अविनाश काकडे, डॉ. रश्‍मी बंगाळे, रहीम खान, ताझीम खान, शैलेश शिंदे आदींनी पुढाकार घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com