agriculture news in Marathi, demand of agriculture equipment in lacs bu will provide in thousand, Maharashtra | Agrowon

अवजारांची मागणी लाखात, उपलब्धता हजारांत

सुर्यकांत नेटके
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

नगर ः शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी शासन अनुदानावर ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा लाभ देते. मात्र मागणी लाखात असते आणि लाभ मिळतो हजारांत. यंदा राज्यातील दीड लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असताना केवळ १० हजार ८९० शेतकऱ्यांनाच अनुदानावर टॅक्टर व अन्य अवजारांचा लाभ मिळणार आहे.

नगर ः शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी शासन अनुदानावर ट्रॅक्टरसह अन्य अवजारांचा लाभ देते. मात्र मागणी लाखात असते आणि लाभ मिळतो हजारांत. यंदा राज्यातील दीड लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांनी अर्ज केलेले असताना केवळ १० हजार ८९० शेतकऱ्यांनाच अनुदानावर टॅक्टर व अन्य अवजारांचा लाभ मिळणार आहे.

मागणी अर्जात पन्नास टक्‍क्यांपेक्षा अधिक मागणी अर्ज हे ट्रॅक्टरसाठी आहेत. मात्र केवळ ४ हजार ८०० शेतकरी लाभार्थी होऊ शकणार आहेत. शेतकऱ्यांच्या उन्नतीत भर पडावी, यासाठी २०१४-१५ पासून शासनाच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘कृषी यांत्रिकीकरण अभियान’ राबवले जात आहे. 

या अभियानाला गेल्या दोन वर्षांपासून ‘‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’’ असे संबोधले जात आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला व सर्वसाधारण अशा गटातून अनुदानावर टॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित, बैल, मनुष्यचलित, पीक संरक्षक, प्रक्रिया, अन्य अवजारांचा लाभ दिला जातो. मजूरटंचाई व अन्य बाबींमुळे शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढल्याने गेल्या चार वर्षांचा विचार करता सर्वाधिक मागणी ट्रॅक्टरला असल्याचे दिसून आले आहे.

कृषी विभागाकडून ट्रॅक्टर व अन्य औजारांसाठी मागणी अर्ज मागवले जातात. मात्र मागणीच्या तुलनेत लाभ देण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे गेल्या काही वर्षांपासून दिसून आले आहे. यंदा राज्यभरातून लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा लाभ मिळावा, यासाठी मागणी केलेली आहे. मात्र शासनाने ठरवलेल्या उद्दिष्टानुसार ४ हजार ८०० लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार आहे.

केवळ टॅक्टरबाबतच नव्हे तर अन्य औजारांबाबतही तशीच अवस्था आहे. यंदा राज्यात १५०० पॉवर टिलर, २५० स्वयंचलित औजार, ३९५३ टॅक्टरचलित औजारे, २०० बैल व मनुष्यचलित औजारे, ११४ पाक संरक्षक औजारे आणि केवळ ७३ प्रक्रिया औजारांचे शेतकरी लाभार्थी असतील. त्यावर अनुदानापोटी ११० कोटी ६६ लाखाचा खर्च होईल.

राज्यातील मागणी शेतकरी संख्येचा विचार करता ही रक्कम तोकडी आहे. त्यामुळे यांत्रिकीकरण योजनेचा लाभ म्हणजे डोंगर पोखरून उंदीर शोधल्यासारखी स्थिती आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये ५६ हजार २११ शेतकऱ्यांनी औजाराची मागणी केलेली आहे. त्यातील ७२० शेतकऱ्यांनाच लाभ मिळणार आहे. २६ हजार ७१४ ट्रॅक्टर मागणारे शेतकरी आहेत. त्यातील ३७० शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळेल.   

यंदा ट्रॅक्टर वाटपाचे उद्दिष्ट (कंसात एकूण औजारे)
ठाणे ः ३० (६८), पालघर ः ४६ (१०४), रायगड ः ७१ (१६२), रत्नागिरी ः ८४ (१८९), सिंधुदुर्ग ः ७० (१६०), नाशिक ः २४० (५४६), धुळे ः ९५ (२१५), नंदुरबार ः ११९ (२७०), जळगाव ः १५४ (३४९), नगर ः ३१७ (७२०), पुणे ः २६६ (६०३), सोलापूर ः २४७ (५६०), सातारा ः २७६ (६२५), सांगली ः २१० (४७७), कोल्हापूर ः १८९ (४३०), औरंगाबाद ः १८२ (४१४), जालना ः १४२ (३२१), बीड ः १६८ (३८१), लातूर ः १४२ (३२२), उस्मानाबाद ः १३७ ( ३११), नांदेड ः १६७ (३७९), परभणी ः ११८ (२६८), हिंगोली ः ८३ (१८७), बुलडाणा ः १६१(३६७), अकोला ः १३९ ( ३१४), वाशीम ः ८९ (२०२), अमरावती ः १४० (३१७), यवतमाळ ः १३७ ( ३११), वर्धा ः ७९ (१७९), नागपूर ः १०२ (२३१), भंडारा ः ७० (१६०), गोंदिया ः ८५ (१९३), चंद्रपूर ः १४५ ( ३२९), गडचिरोली ः १०० (२२६).


इतर अॅग्रो विशेष
शेतकरी कंपन्यांचाही ‘ई-नाम’मध्ये समावेश नवी दिल्ली: केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर...
राज्यात उन्हाचा चटका वाढला पुणे: एप्रिल महिना सुरू होताच राज्यात उन्हाच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३० हजार...नाशिक: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरटंचाई...
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....