Agriculture news in marathi, Demand for bananas increases, prices improve | Agrowon

दुर्गोत्सवामुळे केळीच्या मागणीत वाढ, दरांत सुधारणा

चंद्रकांत जाधव
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

जळगाव : जिल्ह्यात केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, मुक्ताईनगर भागांतील केळीची उपलब्धता कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. यातच दुर्गोत्सवामुळे केळीची स्थानिक बाजारासह उत्तरेकडे मागणी वाढली असून, चोपडा, जळगाव, पाचोरा भागांतील कांदेबाग केळीला १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. 

जळगाव : जिल्ह्यात केळीचे आगार म्हणून ओळख असलेल्या रावेर, मुक्ताईनगर भागांतील केळीची उपलब्धता कमी झाल्याने आवक कमी झाली आहे. यातच दुर्गोत्सवामुळे केळीची स्थानिक बाजारासह उत्तरेकडे मागणी वाढली असून, चोपडा, जळगाव, पाचोरा भागांतील कांदेबाग केळीला १६०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचे दर मिळत आहेत. 

सध्या खानदेशात जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागांत केळीची आवक कमी आहे. रावेरातून सुमारे १०० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) आवक घटली आहे. या भागात पिलबागांमधून केळीची काढणी सुरू आहे. दर्जेदार केळीसंबंधी प्रसिद्ध असलेल्या तापीकाठावरील भागांतील आवक कमी आहे. नंदुरबारमधील तळोदा, शहादा, अक्कलकुवा भागांतही केळीची आवक कमी आहे. चोपडा, जळगाव व पाचोरा भागांत कांदेबाग केळीमध्ये काढणी सुरू आहे. दुर्गोत्सव सुरू होताच उत्तर भारतासह स्थानिक बाजारातून केळीला उठाव वाढला आहे.

राज्यातील कल्याण, ठाणे, पुणे, नागपूर या भागांतूनही मागणी आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मिळून २५० ट्रक केळीची आवक सुरू आहे. दर्जेदार केळीला जादा दर मिळत असून, रविवारी (ता. २९) कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. चोपडा व जळगावमधील तापीकाठानजीकच्या भागात पारंपरिक वाणांद्वारे उत्पादित दर्जेदार केळी आहे. तसेच, उतिसंवर्धित बागांमध्येदेखील उत्तम केळी तयार होत आहे. या भागात उत्तरेकडील मोठे खरेदीदार सावदा (ता. रावेर), फैजपूर (ता. यावल), चोपडा भागातील एजंटच्या माध्यमातून केळीची खरेदी करून घेत आहेत. १३ व १५ किलो क्षमतेच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून केळीची पाठवणूक उत्तरेकडे ट्रकद्वारे सुरू आहे. 

केळीचे दर मध्यंतरी १३०० रुपयांपर्यंत होते. परंतु, जसा तुटवडा वाढू लागला व मागणी सुरू झाली, तशी दरांमध्ये सुधारणा झाली. मागील २० ते २५ दिवसांमध्ये दर क्विंटलमागे सुमारे २८० रुपयांनी वधारले आहेत. 


इतर बाजारभाव बातम्या
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु;...नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात जळगाव : खानदेशात केळीचे दर पुन्हा दबावात आले आहेत...
हिंगोली जिल्ह्यात मोठ्या खरेदीदारांकडून...हिंगोली : जिल्ह्यातील बाजार समित्यांतील हळदीच्या...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(...नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि...
कोल्हापुरात फळांची आवक घटलेलीचकोल्हापूर : बाजार समितीचे व्यवहार पूर्ववत सुरू...
खानदेशात मका, गव्हाच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात मका व गव्हाच्या दरात सुधारणा होत...
पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने...सातारा  ः ‘कोरोना’चा संसर्ग टाळण्यासाठी सुरू...
खानदेशात कडब्याचे दर दबावात जळगाव  ः खानदेशात ज्वारी, मका, बाजरीच्या...
राहुरीत कांदा लिलाव सुरु, पण आवक, दर...राहुरी, जि. नगर : लॉकडाउनमुळे तब्बल दोन...
खानदेशात शिवार खरेदीत मक्याला १३००...जळगाव : खानदेशातील बाजारांत या आठवड्यात मक्‍याची...
अमरावती महापालिका हद्दीत ‘फार्म टू होम...अमरावती ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तासगावला बेदाण्याचे सौदे प्रायोगिक...सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर २२ मार्च पासून...
औरंगाबादमध्ये ज्वारी १८०० ते २०२५ रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
लातूर जिल्ह्यात १२ केंद्रांवर १ लाख २१...लातूर : जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवरून...
मुंबई बाजार समितीत भाजीपाल्याची आवक...मुंबई : मुंबई बाजार समितीत कोरोनाग्रस्त...
रत्नागिरी बाजार समितीत आंब्याची अडीच...रत्नागिरी ः कोरोनाविषयक संचारबंदीमुळे अडचणीत...
औरंगाबाधमध्ये हिरवी मिरची १००० ते १६००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...